
Nashik news : नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर असताना पुरोहित संघात अध्यक्षपदावरुन सुरु असलेला वाद दिवसेंदिवस वाढतो आहे. आजी-माजी अध्यक्षांमध्ये दीड महिन्यांपासून हा वाद सुरु आहे. मात्र हा वाद काही मिटण्याचं नाव घेत नाही. या वादाने आता वेगळच वळण घेतलं आहे.
साडे तीन दशकांपासून पुरोहित संघाचे अध्यक्ष असलेल्या सतीश शुक्ल यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केल्यापासून या वादाला सुरुवात झाली. हा वाद आता मिटण्याऐवजी आणखी चिघळत चालला आहे. आता श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाच्या कार्यकारिणी फलक लावण्यावरुन दोन गटांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. आता हा वाद थेट पोलिस ठाण्यात पोहचला आहे.
संघाचे माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी रविवारी पत्रकारपरिषद घेत नूतन कार्यकारिणी जाहीर केली. या नव्या कार्यकारिणीनुसार सतीश शुक्ल यांनाच पुन्हा अध्यक्ष करण्यात आलं. शुक्ल यांनी जाहीर केलेल्या कार्यकारिणीत जुन्या कार्यकारिणीतील पंचाक्षरी यांच्यासह तिघांना वगळल्यानंतर हा वाद वाढला. त्यावरुन श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी व माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. परिस्थिती इतकी चिघळली की प्रकरण हातघाईवर आलं. पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी हजर होत मध्यरात्री हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काहीसा तणाव निवळला.
परंतु सोमवारी (दि. २८) पुन्हा दोन्ही गटातर्फे एकमेकांविरोधात तक्रार अर्ज देण्यात आले. चंद्रशेखर पंचाक्षरी व त्यांच्या काही गुंडप्रवृत्तीच्या सहकार्यांनी माझ्या कार्यालयात येऊन मला शिवीगाळ केली. तसेच मला व माझ्या मुलाला धमक्या दिल्या जात आहे. पुरोहित संघावर जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो आहे. माझ्यासह माझ्या मुलाच्या जीवितास धोका असल्याने आम्हाला पोलिस संरक्षण मिळावं. तसे न झाल्यास मी उपोषणास बसेल असा इशारा सतीश शुक्ल यांनी दिला आहे.
पुरोहित संघाच्या दुसऱ्या गटाचे अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी मात्र निवडणूक घेऊन स्वतःला अध्यक्ष सिद्ध करून दाखवावे, असे आव्हान सतीश शुक्ल यांच्या गटाला दिले आहे. पंचाक्षरी यांनीही पोलिसांना तक्रार अर्ज दिला आहे.
त्यात म्हटलं आहे की, सतीश शुक्ल यांचा मनमानी कारभार सुरु आहे. त्यातून पुरोहित संघाची मोठी बदनामी होत आहे. कार्यकारिणीचा फलक लावण्यास त्यांना विरोध केला असता त्यांनी खोटे आरोप करत पंचवटी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यांचे आरोप खोटे असून नागरिकांपर्यंत तसेच पोलिसांपर्यंत ते पोहचण्यासाठी अर्ज दिल्याचे चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी म्हटले. तसेच शुक्ल यांची कार्यकारिणी अवैध असून ते कार्यकारिणी पुन्हा स्थापित करु शकत नाही असं पंचाक्षरी यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.