Sanjay Raut News : सत्ता अन् पैशांच्या जोरावर धमक्या देणाऱ्यांना घाबरत नाही; संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांना टोला

Gulabrao Patil Threaten : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह
Gulabrao Patil, Sanjay Raut
Gulabrao Patil, Sanjay RautSarkarnam
Published on
Updated on

Uddhav Thackeray in Jalgaon : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवारी (ता. २३) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे जाहीर सभा होणार आहे. या सभेवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना या दोन पक्षातील नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरू झाला आहे. या सभेच्या नियोजनाची तयारी सुरू आहे. त्यासाठी खासदार संजय राऊत तेथे आहेत. दरम्यान, आम्ही हाडाचे शिवसैनिक आहोत. आंदोलने करण्याचा, दगडे मारून सभा कशा बंद पाडल्याच्या याचा अनुभव आहे, असे वक्तव्य सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

Gulabrao Patil, Sanjay Raut
Amruta Fadnavis News : 'कोण कोण कुठं कुठं डोळा मारतंय..'; अमृता फडणवीसांचा निशाणा कुणावर?

पाचोऱ्यात (Jalgaon) होणाऱ्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मंत्री पाटील यांनी केलेल्या या वक्तव्यावरून दोन्ही शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. आम्ही डरपोक नाही, अशा धमक्यांना घाबरत नाही, असे राऊत म्हणाले. तसेच राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही राऊत यांनी प्रश्न विचारले आहेत.

Gulabrao Patil, Sanjay Raut
Warora APMC News : स्वगृही-वरोरा बाजार समितीत धानोरकरांच्या विरोधात उभा ठाकला कॉंग्रेसचाच एक गट !

सत्ता आणि पैशाच्या जोरावर राज्यातील मंत्री सभेत घुसण्याची धमकी देत असल्याचा आरोप खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. ते म्हणाले, "सत्ता आणि पैशाच्या जोरावर राज्याचे मंत्री धमक्या देत आहेत. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था असल्याचे सांगणारे गृहमंत्री कुठे आहेत? मुख्यमंत्री कुठे आहेत? मात्र अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाहीत. आम्ही पळपुटे नाही. डरपोकही नाही. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही त्यांचा सामना करण्यास सज्ज आहोत."

Gulabrao Patil, Sanjay Raut
Paithan News : बाजार समितीच्या निवडणुकीत राडा; भाषण सुरू असतानाच काँग्रेस नेत्याच्या कानाखाली लगावली

खासदार राऊत यांनी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांना पक्षांतर केल्याबाबत टोला लगावला आहे. राऊत म्हणाले, "पळपुटेपणा करून ते शिंदे यांच्याबरोबर गेले. केवळ दाढी, मिशी असून चालत नाही. त्यासाठी मर्दानगीही असावी लागते. आमचाही छळ होत आहे. आम्हालाही कारागृहात जावे लागले, परंतु आम्ही पक्ष सोडला नाही. शिवसेनेने यांना वर्षापुवर्षे सर्वकाही दिले. मोठे केले, तरी हे पळून गेले. आम्ही शिंदे यांच्याबरोबर का गेलो, याच उत्तर त्यांनी द्यावे. जनता त्यांना निवडणुकीत उत्तर देणारच आहे."

Gulabrao Patil, Sanjay Raut
Loksabha Election Survey : देशात आज निवडणुका झाल्या तर कोण मारणार बाजी? भाजप की काँग्रेस! सर्वेक्षणातून झाले स्पष्ट

यावेळी राऊत यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची मुख्यमंत्री होण्याची अपेक्षा योग्य असल्याचे वक्तव्य केले. खासदार राऊत म्हणाले, "अजित पवाक यांनी मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केली तर बिघडले कुठे? त्यांची अपेक्षा योग्य आहे. काही जण तर लायकी नसतानाही तोडफोड आणि जुगाड करून मुख्यमंत्री होतात. त्यांनी पंतप्रधान मोदींची स्तुती केली तर बिघडले कुठे? पंतप्रधान चांगले काम करीत असतील आम्हीही त्यांची स्तुती करू."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com