Uddhav Thackeray : मोदी म्हणजेच भारत नाही; उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं

Rahul Gandhi : राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे भाजपवर कडाडले
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी 'मोदी म्हणजे काय भारत आहे का?', असं म्हणत भाजपला सुनावलं.

ठाकरे म्हणाले, ''माझ्याकडे काही नाही. तरी हा अथांग जनसागर जमला. ज्यांना मोठे केले ते गद्दार निघाले. अन् मालेगावचा हा वाघ माझ्याकडे आला. मी मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर तुमचे प्रश्न सोडविण्यासाठी लढतोय. येथील ढेकूण चिरडण्यासाठी तोफेची गरज नाही. मालेगावकरांना मी धन्यवाद देतो''.

''कोरोना काळात दोनदा ठोके चुकले. एक धारावी अन् दुसरं मालेगाव. त्यावेळी कुटुंब प्रमुखाप्रमाणेच तुम्ही माझं ऐकलं. आज मला प्रेम दिले. गद्दारांच्या नशिबात हे प्रेम नाही. त्यांनी पक्ष, चिन्ह माझं सगळं चोरलं पण ही जिवाभावाची माणस चोरता येणार नाहीत'', असं म्हणत त्यांनी शिंदेंना टोला लगावला.

Uddhav Thackeray
Malegaon Sabha : खंडोजी खोपड्यांची अवलाद म्हणत उद्धव ठाकरेंचा बंडखोरांवर पुन्हा हल्लाबोल

''कृष्णा डोंगरे या शेतकऱ्याची भेट घेतली. त्याने मिंद्येना रक्ताच पत्र पाठवलं. पण यांना दुसरं वाचता येत नाही. फक्त भाजपची स्क्रिप्ट वाचता येते. तुम्ही म्हणता कांद्याला भाव नाही, या पुर्वी गेल्या निवडणुकीत कांदा खरेदी झाली ना. तो कांदे किती खोक्याला गेला. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे होतो. शेतकरी कर्जमुक्तीसाठी पहिला प्रयत्न केला. पिकेल ते विकेल हे धोरणं आणलं. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना अनुदान देणार होतो. तोच गद्दारी झाली'', असं ठाकरे म्हणाले.

''भाजपचे बावनकुळे मिंद्ये गटाला ४८ जागा देणार म्हणतात. बावनकुळे ५२ जागा तरी द्या. भाजप मिंद्येच्या नेतृत्वाखाली लढणार का हे त्यांनी सांगावे. तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने मते मागा. मी माझ्या वडिलांच्या नावाने मते मागतो. मग पहा राज्य कोणाच्या पाठीशी आहे. एकदाच्या निवडणुका घ्या. होऊन जाऊ द्या फैसला'', असं थेट आव्हान त्यांनी दिलं.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : मालेगावच्या सभेतून उद्धव ठाकरेंनी दिला नवा नारा; आता जिंकेपर्यंत...

दरम्यान. राहुल गांधींवरील कारवाईवरून ठाकरेंनी भाजपला सुनावलं. ''तुमचा नेता म्हणजे माझा भारत असं मुळीच नाही. मोदींवर टीका केली तर भारताचा अपमान. मोदी म्हणजे भारत हे कुणाला मान्य आहे का? मोदी म्हणजे काय भारत आहे का? तुमच्या कुटुंबावर बोललं तर लगेच पोलिसांची कारवाई करतात, माणूस परराष्ट्रात गेला तर त्याला घेऊन येतात'', असं म्हणत राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आल्यावरून उद्धव ठाकरेंनी भाजपला सुनावलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com