
Deolali Assembly Constituency: देवळाली मतदार संघात विविध घटना आणि प्रशासनाची कारवाई याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांच्या वाहनाला मध्यरात्री मोठा अपघात झाला. त्यामुळे हा घातपात की अपघात याविषयी चर्चा सुरू आहे.
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ अविनाश शिंदे काल मध्यरात्री प्रचार कार्यालयाकडे जात होते. यावेळी वडनेर आर्टिलरी सेंटर गेट जवळ त्यांच्या वाहनाला मागच्या बाजूने धडक बसली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. उमेदवार यांना मानेला तसेच पाठीला जबर दुखापत झाली आहे.
मध्यरात्री पावणे दोनला अपघात झाल्याने त्यांना तातडीने मदत देखील मिळू शकली नाही. सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी पोलिसांशी संपर्क करण्यात आला. शिंदे यांची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोमवारी काल मध्यरात्री हा प्रकार घडल्याने आणि उमेदवाराच्या वाहनाचा अपघात असल्याने पोलिसांनी तातडीने त्याची दखल घेतली. या संदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस हा घातपात होता की अपघात, याचा तपास करीत आहे.
दरम्यान याबाबत उमेदवार डॉ शिंदे यांचे बंधू बजरंग शिंदे यांनी या घटनेची चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार स्पर्धेत आहे. अशा स्थितीत राजकीय प्रतिस्पर्ध्यांकडून त्यांचा घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रचारात अडथळा आणण्याचा प्रयत्न म्हणून तर हा अपघात झाला नसावा, असा आम्हाला संशय वाटतो असे सांगितले.
दरम्यान देवळाली मतदार संघात गेल्या 24 तासात अनेक घटना घडल्या आहेत. सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवारासाठी आलेल्या १.९८ कोटी रुपये प्राप्तिकर विभागाने जप्त केले आहेत. त्यानंतर काल रात्री विविध उमेदवारांच्या प्रचारकांच्या निवासस्थानी निवडणूक यंत्रणेने सर्च केल्याचे बोलले जाते. देवळाली मतदारसंघात घडणाऱ्या घटनांमुळे हा मतदारसंघ अचानक चर्चेत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.