Malegaon News; दादा भुसेंच्या मतदारसंघात `कुत्ता` गोलीची सर्रास विक्री?

शहरातील अधिकारी पालकमंत्री भुसे यांच्या प्रचारक बनल्याने अवैध धंद्याचा सुळसुळाट झाल्याचा आरोप
Adway Hire agitation with supporters
Adway Hire agitation with supportersSarkarnama
Published on
Updated on

मालेगाव : (Malegaon) पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांचा मतदारसंघ असलेल्या शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नशेसाठी (Drugs) कुत्ता गोलीची सर्रास विक्री सुरु आहे. बंदी असतानाही गुटखा विक्रीचे रॅकेट जोमात आहे. दुचाकी चोरी, मोबाईल चोरी, चैनस्नॅचिंग या घटना नित्याच्याच झाल्या आहेत. या अवैध धंद्यांना आळा घालावा, अशी मागणी शिवसेना (Shivsena) उध्दव ठाकरेचे (Uddhav Thackrey) नेते अद्वय हिरे (Adway Hire) यांनी केली. (Adway Hire made agitation with supporters In Malegaon)

Adway Hire agitation with supporters
Dada Bhuse News: ...तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विरोध करणार!

शहरातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस निरीक्षक अशी महत्त्वाची पदे रिक्त असल्याने ती भरली जावी. पालकमंत्र्यांचे प्रचारक म्हणून काम करणे अधिकाऱ्यांनी बंद करावे अशी मागणी शिवसेना उध्दव ठाकरेचे नेते अद्वय हिरे यांनी शुक्रवारी येथे केली.

Adway Hire agitation with supporters
Chhagan Bhujbal: `असा` निर्णय घ्यायचा होता तर प्रतिज्ञापत्र कशासाठी मागवली?

उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी धरणे आंदोलन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेतर्फे अपर जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

श्री. हिरे म्हणाले, शिवसेनेच्या निष्ठावंत शिवसैनिकांवर पालकमंत्र्यांच्या आदेशाने अन्याय-अत्याचार सुरु आहेत. पोलिस प्रशासन पालकमंत्र्यांच्या हातातले बाहुले झाले आहे. कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस व गुन्हे दाखल होत आहेत.

स्वार्थ असलेल्या कामांकडेच ते लक्ष देतात. येथील टक्केवारीचा आकडा अधिकाऱ्यांना झेपत नाही. म्हणून ते येथे येत नाही असा आरोप त्यांनी यावेळी केला. काम व टक्केवारीचे मालेगावला समीकरण झाले आहे. शेती सिंचनासाठी धरणांचे आवर्तन सोडले नाही. मात्र बंदिस्त जलवाहिनीचे थाटात उद्‌घाटन केले.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात अवैध धंदे बंद करा, कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे बंद करावे, दुचाकी, मोबाईल चोरी व चैनस्नॅचिंगला आळा घालावा, तालुक्याला पूर्णवेळ तहसीलदार, गटविकास अधिकारी व पोलिस निरिक्षक नियुक्ती करा, खासगी वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार थांबवावा आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी प्रमोद शुक्ला, माजीद मन्सुरी, साहेबराव वाघ, गुलाब पगारे, सनी जगताप, शेखर पगार, प्रवीण देसले, रामा मिस्तरी आदींनी मनोगत व्यक्त केले. धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com