Eknath Shinde Politics: एकीकडे ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सत्ताधाऱ्यांची टिका...दुसरीकडे सत्ताधारी एकनाथ शिंदेंच्या शिलेदाराचा मतदारयादीवरून संताप अन् आरोप!

ECI-Voters-list-dispute-Nashik,Ruling-Sivsena-Eknath-Shinde-NMC-Election-Shivsena-added-headache-to-BJP-धक्कादायक, निवडणूक आयोगाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह, एका प्रभागातील नऊ हजार मतदारांना आयोगाने केले बेघर
Eknath-shinde-devendra-Fadanvis
Eknath-shinde-devendra-FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: मतदारयादीतील सदोष नावे आणि संशयास्पद मतदार आणि त्यांचे पत्ते हा वादाचा विषय बनला आहे. विरोधकांनी त्या विरोधात आवाज उठवला. भाजप मात्र निवडणूक आयोगाचा बचाव करण्यात व्यस्त आहे.

राज्याच्या मतदारयादीत मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. दुबार आणि चुकीची नावे असल्याचे पुरावे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सादर केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने आता त्यात उडी घेतली आहे.

मतदारयादी विषयी ठाकरे बंधूंच्या मोर्चानंतर राज्यातील महायुती सरकारकडून विरोधकांवर टीका केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत ठाकरे बंधूंचा समाचार घेतला. सत्ताधारी भाजपने मतदारयादीचे समर्थन केले. असे असतानाच सत्ताधारी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाने मतदारयादीची तक्रार करून भाजपला घरचा आहेत दिला आहे.

Eknath-shinde-devendra-Fadanvis
Chhagan Bhujbal : बिहारमध्ये प्रचारात बॅनरवर भुजबळांचा फोटो लावण्यास मनाई, उमेदवार म्हणाला मग उमेदवारीच नको..

दोन दिवसांपूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे कायदा आघाडीचे प्रमुख ॲड हर्षल केंगे, जिल्हाप्रमुख ॲड अभय महादास, ॲड सुनिल म्हैसधुने, ॲड हार्दीक देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. शहरातील चार मतदारसंघांमध्ये २.९८ लाख मतदार वादग्रस्त आणि दुबार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी दोन महिने परिश्रम घेऊन याद्यांची छाननी केली.

Eknath-shinde-devendra-Fadanvis
Ambadas Danve Shivsena Vs BJP : अंबादास दानवेंनी फोडला आरोपाचा बॉम्ब; भाजपच्या माजी नगरसेवकाकडून आमदाराच्या हत्येची सुपारी? गिरीश महाजनांचा संदर्भ दिल्यानं खळबळ

मतदार यादीतील त्रुटींचे पुरावे पेन ड्राईव्ह मध्ये प्रशासनाला देण्यात आले. यापूर्वी शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर सचिव मसुद जिलानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तीन लाख ११ हजार मतदार बोगस असल्याचा दावा केला होता. त्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.

आता शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शहराध्यक्ष मतदार यादीतील गोंधळाने संतापले आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक २४ मधील अनेक गंभीर त्रुटी मांडल्या आहेत. प्रभागातील तब्बल नऊ हजार मतदारांना पत्ते नाहीत. त्यामुळे यामध्ये मोठा संशय निर्माण झाला आहे.

शहराध्यक्ष प्रविण (बंटी) तिदमे यांनी या प्रकाराने महापालिका निवडणुकीची पारदर्शकता धोक्यात आल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, निवडणूक मतदार याद्या या मतदानासाठी प्रमुख साधन आहेत. प्रशासनाने त्यासंदर्भात कोणतीही दक्षता घेतली नाही, असे दिसते.

लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी सर्वप्रथम मतदार यादीतील घोळ उघडकीस आणला. वोट चोरी या प्रश्नावर देशभर राजकारण पेटले. राज्यात ठाकरे बंधूंनी या प्रश्नावर रान उठवले आहे. त्याचा प्रतिवाद करताना भाजप अडचणीत आला आहे. आता भाजपला त्यांचा सहकारी आणि सत्ताधारी शिवसेना शिंदे पक्षाने या प्रश्नावर पुन्हा एकदा अडचणीत आणले आहे.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com