
Mumbai News : महाराष्ट्राच्या राजकारणात 2019 नंतर मोठी उलथापालथ पाहायला मिळाली होती. जे स्वप्नांतही घडेल असं वाटलं नव्हतं, ते प्रत्यक्षात घडूनही आलं.उद्धव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेली, अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सत्तेत सामील झाली. पण नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंच्या शिवसेना आणि मनसे पक्षानं निराशाजनक कामगिरी केली. यानंतर महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही ठाकरेंनी एकत्र यावं अशा चर्चांना जोर आला. पण दोन्ही ठाकरेंनी या चर्चांना झिडकारुन लावलं.अशातच पुन्हा एकदा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
येत्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं मुंबईत'ठाकरे बंधू मिलन'हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकत्र आणण्यासाठी आता मुंबईतील मराठी सेनेनं मोठं पाऊल उचललं आहे.
मराठी सेना पक्षानं मुंबईतील दादर सेनाभवन परिसरात यापूर्वी दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र याव या आशयाची बॅनरबाजी केली होती. आता त्यांनी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर निमंत्रण पत्रिका ठेवली आहे.या बंधू मिलन कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेद्वारे थेट मराठी सेनेनं भावनिक मुद्द्यालाच हात घालत बंधुत्वाचा संदेश देण्यासाठी मोठा उपक्रम हाती घेतला आहे.
मराठी माणसाच्या हितासाठी एकत्रं येणं ही काळाची गरज आहे,तरी आपली उपस्थिती वंदनीय असेल, असं या निमंत्रण पत्रिकेत म्हटलं आहे.हा बंधू मिलन कार्यक्रम गुढीपाडव्याच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबई येथे सकाळी ११ वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाजवळ होणार आहे.
मराठी सेनेचे मोहनिश राऊळ यांनी बंधू मिलन कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ठेवली आहे.या पत्रिकेत बंधू मिलन निमंत्रण,भाऊ माझा आधार, माझ्या ध्येयाचा किनारा, आयुष्याच्या प्रत्येक सुख दुःखाचा सोबती, भाऊ माझ्या जीवनाचा आधार असा मजकूर असल्याचंही दिसून येत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर आता मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. महायुती व महाविकास आघाडीसह इतर प्रादेशिक पक्षांकडूनही महापालिका निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. याचदरम्यान,आता विधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या अपयशानंतर ठाकरे बंधूंनी आतातरी एकत्र यावं अशी भावना मराठी माणसांकडून व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एका विवाहसमारंभात एकत्र दिसून आले होते. एवढंच नाहीतर या दोघांमध्ये हास्यविनोद होतानाही पाहायला मिळालं होतं. त्यामुळे ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अस वाटणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना सुखद धक्काही बसला. तर यावर राजकीय वर्तुळातून उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.