Devendra Fadnavis : खडसेंच्या बागेतील खजूर फडणवीसांना गोड, दरवर्षीची परंपरा यंदाही ठेवली कायम, काय आहे विषय?

Eknath Khadse, BJP Entry : सध्या एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, मंत्री गिरीश महाजन यांच्या गटाचा त्यांच्या प्रवेशाला विरोध असून तशा हालचाली राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
Devendra Fadnavis, Eknath Khadse
Devendra Fadnavis, Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. त्याला निमित्त ठरलं ते खडसे व भाजपचे राष्ट्रीय महामंत्री तथा राज्यसभा सदस्य विनोद तावडे यांच्यात मुंबईत झालेल्या भेटीचे...

खासदार विनोद तावडे यांनी बुधवारी (दि. 8) एकनाथ खडसे यांची मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. खडसेंच्या प्रकृतीची विचारपूस करत तावडेंनी त्यांच्याशी विविध मुद्यांवर तासभर चर्चा केली. या भेटीनंतर पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्या भाजपमधील घरवापसीच्या चर्चा रंगल्या आहेत.

खडसे हे जळगावच्या राजकारणातील वजनदार नेते होते. २०१४ च्या निवडणुकीत राज्यात भाजप सत्तेत आलं. त्यावेळी खडसे मुख्यमंत्रीपदासाठी इच्छुक होते, मात्र पक्षाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं. पण तेव्हाही खडसे तब्बल १२ खात्यांचे मंत्री होते. परंतु भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे दोन वर्षातच त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. पक्षात डावललं जात असल्याच्या भावनेतून एकनाथ खडसे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांच्यासोबत मतभेद वाढले होते. त्यातूनच खडसेंनी पुढे जाऊन पक्षही सोडला.

Devendra Fadnavis, Eknath Khadse
Devendra Fadnavis favorite web series : देवेंद्र फडणवीस बघतायत एक जबरदस्त क्राईम थ्रिलर वेब सिरीज... जाहीरपणे सांगितलं नाव

२०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीवेळी खडसेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोरात झाली. त्यावेळी खडसेंनी तावडेंसह अमित शाह, तत्कालीन अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या भेटी घेतल्या. परंतु गिरीश महाजन यांचा खडसेंच्या भाजप प्रवेशाला विरोध असल्यानेच आजवर खडसे यांची घरवापसी होऊ शकली नाही असे सांगितले जाते. पंरतु आता पुन्हा एकदा खडसेंच्या घरवापसीच्या चर्चा सुरु झाल्याने, महाजन समर्थक अस्वस्थ झालेले आहेत. जिल्ह्यातील आमदार-जिल्हाध्यक्षांची मुंबईत तातडीची बैठक होऊन खडसेंचा संभाव्य प्रवेश रोखण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.

फडणवीसांनाही पोहचले खजूर

दुसरीकडे खडसेंच्या भाजप प्रवेशाला स्थानिक पातळीवर पक्षातून विरोध होत असला तरी, इकडे तावडेंशी चर्चा करीत असताना खडसेंनी दरवर्षाची परंपरा कायम ठेवली. एकनाथ खडसे मुक्ताईनगर येथे स्वत: खजूर व जांभळाची शेती करतात. प्रयोगशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मुक्ताईनगरातील बागेतील ओल्या खजुरांचा गोडवा निराळाच असल्याचं ते सांगतात. खडसे दरवर्षी त्यांचे निकटवर्तीय, नेतेमंडळी, अधिकाऱ्यांना जिल्ह्यात व राज्यभरात हे खजूर आवर्जून पाठवितात. यंदाही त्यांचे हे खजूर फडणवीसांसह दोन उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनाही ते चांगलेच भावले. खडसेंनी त्यांच्या बागेतील ओले खजूर तावडेंना देखील भेट म्हणून दिले.

Devendra Fadnavis, Eknath Khadse
Eknath Khadse : मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीची स्वप्न बघितली; पण, एका शिवसैनिकाने संपवलं 40 वर्षांचं राजकारण

फडणवीसांना महाजन जाऊ देतील?

खडसेंच्या २ सप्टेंबरला होणाऱ्या अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतनानिमित्त त्यांच्याकडून भाजपतील केंद्रीय पातळीवरील नेत्यांपासून प्रदेशातील व सर्वपक्षीय नेत्यांना आमंत्रण दिलं जात आहे. खडसेंनी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे फडणवीसांनाही आमंत्रण दिल्याचं सांगितलं जात आहे. परंतु मंत्री महाजन फडणवीसांनी जाऊ नये म्हणून प्रयत्नशील असल्याच्या खुमासदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. त्यामुळे खडसेंच्या वाढदिवसाच्या भव्य सोहळ्याला भाजपमधील कोण कोणते नेते उपस्थितीत राहणार, या सोहळ्यात खडसेंचा भाजप प्रवेश होतो का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com