Gulabrao Patil : 13 खात्यांचे मंत्री होता, तरी घर सोडलं ; गुलाबराव पाटलांनी जुन्या खपल्या काढल्या, खडसेंना घरवापसीवरुन चिमटे

Gulabrao Patil On Eknath Khadse : पहिला पिक्चर संपला आहे, आता पुन्हा नवीन पिक्चर सुरू करणे इतके सोपे नाही. त्याला नटही तसा लागतो असा चिमटा गुलाबरावांनी खडसेंना काढला आहे.
Eknath KHadse vs Gulabrao Patil .jpg
Eknath KHadse vs Gulabrao Patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यात अलिकडेच मुंबईत एक महत्त्वपूर्ण भेट झाली. त्यानंतर खडसेंनी मुंबईतील ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेतली. या भेटीगाठींमुळे राज्याच्या राजकारणात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, खडसेंच्या घरवापसीच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. असे असताना, शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना चिमटा काढला आहे.

पहिला पिक्चर संपल्यानंतर पुन्हा नवीन पिक्चर सुरू करणे इतके सोपे नसते. शेवटी त्यासाठी नटही तसाच असावा लागतो, असा टोला शिवसेना नेते व मंत्री गुलाबराव पाटील यांनी खडसेंना लगावला आहे. पाटील यांनी शनिवारी जळगाव येथे पत्रकारांशी विविध विषयांवर संवाद साधला. यावेळी त्यांनी खडसे यांच्या राजकीय हालचालींवर भाष्य केले.

गुलाबराव म्हणाले, खडसे कोणत्या कारणासाठी भेटी घेत आहेत, हे मला माहिती नाही. मात्र, ज्या घरात तुम्ही १३ खात्यांचे मंत्री होते, त्या घरातूनच तुम्ही बाहेर पडलात. आता पुन्हा त्याच घरात जाऊन काय मिळणार आहे? घरवापसी करून नेमके काय साध्य होणार, हा प्रश्न आहे.

Eknath KHadse vs Gulabrao Patil .jpg
Gulabrao Patil : 'विठू माऊली तू माऊली जगाची', शिंदेचा शिलेदार विठ्ठल भक्तीत तल्लीन; स्वतः आपल्या आवाजात गायलं गीत... (VIDEO)

आपला शेवटचा कार्यक्रम चांगला व्हावा, कुटुंबातील सदस्य, समर्थक आणि कार्यकर्त्यांची लाईन लागावी, यासाठीच सगळा खटाटोप खडसेंचा सुरु आहे, दुसरे काही नाही असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

खडसेंच्या भूमिकेवर बोलताना पाटील म्हणाले, सरकारवर टीका करा, सरकारचे वाभाडे काढा, तो तुमचाच हक्क आहे. पण भूतकाळातील भूमिका विसरून चालणार नाही. गतकाळात भाजप-शिवसेना युती तोडण्यात पुढाकार घेतल्याचे छातीठोकपणे सांगणारेही तेच होते. ‘मीच युती तोडली, काही करण्याची वेळ आली की मीच पुढे होतो,’ असे ते स्वतः सांगत. त्यामुळे आजच्या घडामोडींकडे पाहताना त्या भूमिकांचाही विचार व्हायला हवा असं गुलाबराव म्हणाले.

Eknath KHadse vs Gulabrao Patil .jpg
Eknath Khadse on Vinod Tawde meeting : विनोद तावडेंच्या भेटीवर एकनाथ खडसेंनी सोडलं मौन; म्हणाले, राजकीय...

शुभेच्छा द्यायला हरकत नाही.

एकनाथ खडसे भाजपसह सर्वच प्रमुख नेत्यांना वाढदिवसाच्या कार्यक्रमाला बोलावत आहेत, यावर विचारले असता पाटील म्हणाले. त्यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सर्वांना बोलवावे. सगळेच येतील. त्यांनी मला निमंत्रण दिल्यास मीदेखील नक्की जाईन. ते माझ्या जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आहेत. राजकीय मतभेद असले तरी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी काहीही हरकत नाही असे पाटील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com