Eknath Khadse on Raksha Khadse: रक्षा खडसे लोकसभा कुणाच्या तिकीटावर लढणार?

Jalgaon Politics:जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आले नाहीत.
Eknath Khadse on Raksha Khadse:
Eknath Khadse on Raksha Khadse:Sarkarnama

Eknath Khadse on Raksha Khadse Politics: ''जो ज्या स्थानी आहे तो त्या स्थानी राहिलं. भाजपमध्येही अशी अनेक उदाहरणे आहेत. माधवराजे शिंदे, ज्योतिरादित्य शिंदे, हर्षवर्धन पाटील, अशी भाजपमध्ये अनेक उदाहरणे दाखवता येतील. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये असले तरी अद्यापही त्यांच्या मुलीने अजूनही भाजपमध्ये प्रवेश केला नाही. पण जो ज्या ठिकाणी आहेत. तिथे त्यांनी काम करावं. रक्षा खडसे भाजपमध्ये असतील तर त्यांनी तिथेच प्रामाणिकपणे काम करावं. एका घरात असले तरी विचार वेगवेगळे असू शकतात. अशी अनेक उदाहरणे आहेत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी एका वृत्तवाहिनीला नुकतीच मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या आरोपांवरही भाष्य केलं. रक्षा खडसे यांना भाजपमध्ये (BJP) मोकळे पणाने काम करण्याची संधी मिळते का, असा सवाल विचारला असता खडसे म्हणाले की, ४० वर्ष काम करताना माझ्यावर कोणी आरोप केला नाही. पण अचानक माझ्यावर आरोप झाले, जमीन घोटाळ्याचे आरोप, कधी दाऊशी संबंध असल्याचे आरोप, इतके आरोप होऊ लागले, मिडीया ट्रायल झाल्या, चौकश्या होऊ लागल्या. लोकांना वाटलं इतका भ्रष्ट कसा असू शकतो. पण या सर्वांच्या मागे कोण सुत्रधार होता. हेही नंतर लोकांच्या लक्षात आले. कोण कट करतयं हे लोकांना पटत होतं. याच्यामागे कोणीतरी असल्याशिवाय एवढ सगळं होणार नाही, हेही लोकांना दिसत होतं.

Eknath Khadse on Raksha Khadse:
Eknath Khadse on Hindutva: 2014 नंतर हिंदुत्वाची व्याख्या बदलली का?

पण ज्या पक्षासाठी मी इतकी वर्षे काम केलं. त्याच पक्षात माझा छळ झाला. माझ्यावर भ्रष्टचाराचे आरोप झाले. माझ्याकडून राजीनामा घेतला गेला.अनेक चौकशा लावल्या, त्या पक्षात आता मी पुन्हा जाणार नाही.भाजपमध्ये ज्यांच्यावर मोठे-मोठे भ्रष्टाचाराचे आरोप आहेत ते पक्षात येऊन स्वच्छ झाले. अडचणीच्या काळात शरद पवार यांनी मला विधानपरिषद सदस्य बनवून राजकीय विजनवासातून बाहेर काढले. त्यामुळे आता भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही.’ अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. (Maharashtra Politics)

Eknath Khadse on Raksha Khadse:
Gondia News : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जिल्ह्यात जिल्हाध्यक्षांच्या विरोधात सरसावला एक गट, नाना स्वतः घेणार क्लास !

जे भाजपला सोडून गेले ते पुन्हा भाजपमध्ये आले नाहीत. एकतर त्यांच निधन झालं किंवा बरेच जण घरीच आहेत. पण नव्याने भाजपमध्ये कोणीही आलेलं नाही. वर्षानुवर्षे जे भाजपमध्ये आहेत, ज्येष्ठ आहेत, त्यांना भाजपमध्ये अपमानास्पद वागणूक दिली जाते, आम्ही २०१४ ला आणि २०१९ मध्ये सर्वांची मोठी मेहनत होती. त्यावेळी सरकार विरोधी वातावरण निर्माण झालं होतं. भाजपचचं सरकार येणार असल्याची वातावरण निर्मिती झाली होती. त्याच काळात अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com