
Maharashtra Politics : भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला आहे. त्यामुळे खडसे-विरुद्ध महाजन वाद चांगलाच पेटला आहे. महाजन यांच्या समर्थनार्थ महायुतीचे नेते मैदान उतरले असतानाच जेष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांनीही महाजन यांना साथ देत एकनाथ खडसे यांच्याविरोधात महिला आयोगात तक्रार दाखल केली आहे.
महिलांचा अवमान केल्याप्रकरणी एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. दरम्यान, गुणरत्न सदावर्ते म्हणजे बेगानी शादी में अब्दुला दिवाना असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलं आहे. गुन्हा दाखल करायचा तर करा काही हरकत नाही असही एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
महिला अधिकारी या सावित्रीच्या लेकी आहेत. त्यांना बदनाम करणे योग्य नाही. गिरीश महाजन यांची माफी मागा अन्यथा राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार करेल असा इशारा गुणरत्न सदावर्ते यांनी दिला होता. त्यानुसार, एकनाथ खडसे यांनी सार्वजनिक ठिकाणी महिलांचा अपमान केला. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. म्हणून राज्य महिला आयोग, राष्ट्रीय महिला आयोग आणि राज्यपाल यांच्याकडे तक्रार दिली आहे. अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे.
दरम्यान सदावर्ते यांनी या प्रकरणावर बोलताना एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तू म्हणत होता ना, तुझ्यात दम आहे ना, गिरीश महाजन यांना म्हणाला होता ना तुम्ही लावा ईडी मी लावतो सीडी…दोन तीन वर्षातच तुझ्या कुटुंबातील व्यक्ती जेलमध्ये होती, तेव्हा तुझी सीडी कुठे होते? असा प्रश्न व एकरी उल्लेख करत सदावर्ते यांनी खडसेंवर पारा चढवला.
गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी व्हायरल केलेल्या क्लीपच्या आधारावर खडसे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. गिरीश महाजन यांचे एका महिला आयएस अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा दावा करण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही या बाबतची कल्पना असून आपण त्यांना यासंबधी भेटून विचारणा करणार असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. त्यानंतर हा वाद आता चांगलाच पेटला आहे. या वादात जेष्ठ वकिल गुणरत्न सदावर्ते यांनीही उडी घेतली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.