
Nashik Sukhoi Crash : निफाड तालुक्यातील शिरसगाव शिवारात लढाऊ विमान कोसळल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. 4 जुन 2024 ची ही घटना आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी निवडणूक निकालाच्या दुसऱ्याच दिवशी विमान दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली होती. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. मात्र, तरीही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी प्रशासनाला दहा महिने लागले. अखेर या अपघातास १० महिने झाल्यानंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली आहे.
नियमीत सरावासाठी 4 जुन 2024 रोजी उड्डाण केलेले लष्कराचे सुखोई एस बी 182 हे लढाऊ विमान नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरसगाव शिवारात कोसळलं होतं. विमानात काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यानं विमान कोसळलं. दुपारी 1 वाजून दहा मिनिटांनी ही घटना घडली होती. अचानक झालेल्या या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली होती. यात प्रसंगावधान राखत पॅराशूटच्या सहाय्याने उडी घेतल्याने वैमानिक आणि सहवैमानिक दोघेही सुदैवाने बचावले होते.
मात्र, या अपघातात स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा, टॉमेटो व कोथिंबीर या पिकांचे तसेच विहिरीचे नुकसान झाले होते. या अपघातास १० महिने झाल्यानंतर अखेर एचएएल प्रशासनाकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३२ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.
या शेतकऱ्यांना मिळाली मदत
यात एकुण तीन शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. शिरसगाव येथील शेतकरी सुखदेव मोरे यांच्या द्राक्षबागेचे नुकसान झाल्याने त्यांना २६ लाख रुपयांची मदत मिळाली. ज्ञानेश्वर मोरे या शेतकऱ्याचे टोमॅटो पिकासह विहिरीचे नुकसान झाल्याने त्यांना पाच लाख ८० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. तर लक्ष्मण मोरे यांच्या कोथिंबीर पिकाचे नुकसान झाले होते. त्यांना ७३ हजार रुपयांची मदत एचएएल प्रशासनाकडून थेट त्यांच्या बँक खात्यात टाकण्यात आली आहे.
इतकी दिरंगाई का?
मदत मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. पण, या घटनेला आता दहा महिने पूर्ण झाले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघात खासदारकीला निवडून आलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार गट) भास्कर भगरेंनी आपल्या कर्तव्याची तत्परता दाखवत निवडून आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या घटनेची पाहणी केली होती. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याशी संपर्क साधत त्यांनी तत्काळ मदतीच्या सूचनाही केल्या होत्या. मात्र, तरीही शेतकऱ्यांना मदत मिळण्याठी दहा महिने थांबावे लागले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.