khadse Vs Mahajan : विस्तव पुन्हा पेटला; खडसेंनी महाजनांना कोर्टात खेचलं; महाजनांची किंमत 1 रुपया

Jalgaon Politics : माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी संशयास्पद वक्तव्य केले होते.
khadse Vs Mahajan
khadse Vs MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon: भाजपचे नेते, मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यात पुन्हा जुंपली आहे. खडसेंनी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयात महाजनाच्याविरोधात एक रुपयाचा फौजदारी दावा दाखल केला आहे.

खडसे व महाजन या दोघांमधील राजकीय वैमनस्य संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. एकमेकांवर अगदी टोकाला जाऊन टीका, आरोप-प्रत्यारोप दोघे मातब्बर नेते नेहमी करीत असतात. त्यांच्यातील विस्तव पुन्हा पेटला आहे.

गिरीश महाजन यांनी आपल्याविरोधात वेळोवेळी बदनामीकारक वक्तव्ये केली आहेत, असा आरोप करीत खडसेंनी महाजनांना कोर्टात खेचलं आहे. त्यांनी महाजन यांच्याविरोधात एक रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावासुद्धा दाखल केला आहे. ॲड. हारुल देवरे, तसेच ॲड. अतुल सूर्यवंशी यांच्या माध्यमातून एकनाथ खडसे यांनी दावा, तसेच फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.

महाजनांची किंमत फक्त एक रुपया

खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर याआधीही अशाच स्वरूपाचा दावा दाखल केला होता, त्यानंतर आता पुन्हा खडसेंनी दावा दाखल केल्याने खडसे आणि महाजन यांच्यातले मतभेद पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. गिरीश महाजन यांची किंमत माझ्याजवळ एक रुपयाची आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध एक रुपयाचा अब्रूनुकसानीचा दावा दाखल करीत असल्याचं एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

कोर्टात दाद मागणार : खडसे

महाजन यांनी माझ्या मुलाच्या मृत्यूविषयी संशयास्पद वक्तव्य केले होते. तसेच माझ्या आजाराविषयीसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे वक्तव्य केलं होतं. यामुळे समाजात माझी बदनामी झाली. त्यामुळे महाजन यांच्याविरुद्ध कोर्टात दाद मागितली आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली.

R...

khadse Vs Mahajan
Manoj Jarange: मनोज जरांगे मुंबईत कसे पोहोचणार; असा आहे मार्ग

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com