Eknath Khadse Land Case : जमीन खरेदीचे शुक्लकाष्ठ; एकनाथ खडसे आणि कन्येला न्यायालयाचा दिलासा! काय आहे संपूर्ण प्रकरण?

Eknath Khadse daughter court decision: जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे आणि त्यांच्या कन्येला न्यायालयाकडून दिलासा. पण नेमकं प्रकरण काय, आरोप काय होते आणि न्यायालयाने काय म्हटलं जाणून घ्या.
Jalgaon land fraud case against Eknath Khadse
Jalgaon land fraud case against Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Eknath Khadse and Sharda Khadse case details: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे आणि राजकीय वाद हे समीकरण कायम आहे. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात खडसे आणि त्यांचे विरोधक दोघांचीही राजकीय खडाजंगी सुरू असते. यातील एका प्रकरणाने पुन्हा उचल खाल्ली आहे.

भुसावळ (जळगाव) येथील कथित वतन जमीन खरेदीचा गैरव्यवहार आता पुन्हा पुढे आला आहे. या खटल्यात एकनाथ खडसे यांनी अटक टाळण्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे दोघांविरोधात याबाबत तक्रार आहे.

संबंधित मानपुर येथील जमीन खरेदीचे प्रकरण 24 वर्ष जुने आहे. त्यांच्या विरोधकांनी त्याबाबत तक्रार केली होती. त्यामुळे खडसे यांना या प्रकरणात नव्याने अटक होण्याची शक्यता होती. खडसे आणि त्यांची कन्या शारदा खडसे यांनी याबाबत भुसावळ न्यायालयात अटकपूर्व जामीन मागितला होता. त्याची नुकतीच सुनावणी झाली. न्यायाधिश एसटी सूर यांनी या प्रकरणात खडसे यांना दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला.

Jalgaon land fraud case against Eknath Khadse
Maratha Reservation : "मला नाही वाटत ते उपोषणाला बसतील..."; जरांगेंच्या भेटीसाठी निघालेल्या मंत्री विखे पाटलांचं मोठं वक्तव्य

प्रदीर्घ काळ रघडलेल्या या खटल्यात खडसे यांच्या राजकीय विरोधकांनी पुन्हा उचल खाल्ली होती. त्यामुळे खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर या निकालाला विशेष महत्त्व दिले जात आहे. न्यायालयाने या संदर्भात महत्त्वाचे निरीक्षण नोंदविले आहे. संबंधित प्रकरण 24 वर्ष जुने आहे.

दीर्घ काळानंतर त्यात तक्रार नोंदविण्यात आली होती. त्यामुळे या प्रकरणातील फसवणूक आणि बनावट गिरीचा आरोप संशयास्पद वाटतो, असे न्यायालयाने म्हटले. संबंधित प्रकरण दिवाणी स्वरूपाचे आणि राजकीय दृष्ट्या प्रेरित होते. त्यामुळे या प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी खडसे विरोधकांनी केली होती. न्यायालयाने ती फेटाळली.

Jalgaon land fraud case against Eknath Khadse
Jalgaon MLC Election: जळगावसाठी गिरीशभाऊ कॉन्फिडंट; इच्छुकांना आता फक्त निरोपाची प्रतीक्षा!

मानपुर (भुसावळ) येथील संबंधित जमिनीचे हस्तांतरण 2002 मध्ये कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून झाले आहे. प्रदीर्घ काळानंतर याबाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती. खडसे यांच्या विरोधकांनी हे प्रकरण नव्याने उकरून काढले होते. त्यामुळे खडसे यांच्या मागे राजकीय वादाचे शुक्लकाष्ठ कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com