Eknath Khadse Politics: एकनाथ खडसेंचा टोमणा, भाजप आता 'पवित्र' झाला, गिरीश महाजनांना केले लक्ष्य!

Eknath khadse; NCP leader Eknath Khadse taunted Sudhakar Badgujar's entry to BJP'S Girish Mahajan -सुधाकर बडगुजर प्रकरण आणि त्यावरून भारतीय जनता पक्षावर होणारी टीका थांबायलाच तयार नाही. विरोधी पक्षांना मिळाले आयते कोलीत.
Girish-Mahajan-Eknath-Khadse.jpg
Girish-Mahajan-Eknath-Khadse.jpgSarkarnama
Published on
Updated on

Eknath khadse News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर हा विषय भाजपला सोडायला तयार नाही. आता एकनाथ खडसे यांनीही यावरून भाजपला टार्गेट केले आहे. त्यामुळे बडगुजर यांचा प्रवेश महापालिका निवडणुकीत प्रचाराचा मुद्दा बनतो की काय अशी स्थिती आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे बडतर्फ उपनेते सुधाकर बडगुजर यांनी नुकताच भाजप पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाला भाजपच्या स्थानिक आमदार सीमा हिरे यांसह १४ माजी नगरसेवकांचा प्रखर विरोध होता. हा विरोध असतानाही बडगुजर यांचा वाजत गाजत प्रवेश झाला.

सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश राज्यभर टिकेचा विषय आहे. श्री बडगुजर यांच्यावर भाजपच्याच नेत्यांनी देशद्रोही, गद्दार आणि टेंडर मॅनेज करणारा माणूस असे जाहीर आरोप केले होते. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही त्यातून आयतेच कोलीत मिळाले आहे.

Girish-Mahajan-Eknath-Khadse.jpg
Nashik Politics : सुधाकर बडगुजर यांच्या एका कौशल्यावर 'गिरीश महाजन' फिदा... सीमा हिरेंना विरोध जड जाणार?

या संदर्भात श्री बडगुजर यांचा प्रवेश घडवून आणणारे गिरीश महाजन यांचे कट्टर विरोधक एकनाथ खडसे देखील पुढे आले आहेत. श्री खडसे यांनी भाजप नेत्यांचे नाव घेण्याचे टाळले. मात्र त्यांचा रोख प्रामुख्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन यांच्याकडे होता.

Girish-Mahajan-Eknath-Khadse.jpg
NCP Ajit Pawar Politics: भाजप, शिवसेनेत प्रवेश सोहळे, अजित पवारांची महापालिका निवणुकीसाठी खास रणनीती!

श्री खडसे म्हणाले, माझ्या प्रवेशाला या नेत्यांनी अनेक कारणे देत विरोध केला. मला प्रवेश देताना अनेक आक्षेप घेण्यात आले. मात्र आता सुधाकर बडगुजर यांना प्रवेश देऊन भाजप 'पवित्र' झाली आहे, या शब्दात त्यांनी आपली सल व्यक्त केली.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने सुधाकर बडगुजर यांना पक्ष विरोधी कारवाया केल्याने बडतर्फ केले होते. त्यानंतर बडगुजर यांनी भाजप पक्षात प्रवेश केला. मी जेव्हा भाजप पक्षात प्रवेश करीत होतो तेव्हा मला नकार देण्यात आला. बडगुजर यांना मात्र प्रवेश देताना काय निकष लावले? त्यांना प्रवेश दिल्याने भाजप पवित्र झाली आहे का? असा प्रश्न खडसे यांनी केला.

एकंदरच भाजपने आपल्या स्थानिक राजकारणाचा भाग म्हणून सुधाकर बडगुजर यांना बदनाम करण्याचा पुरेसा प्रयत्न केला. विरोधात विविध गुन्हे दाखल करण्यासाठी भाजपने आपल्या सत्तेचा वापर केला, हे लपून राहिले नाही. आमदार नितेश राणे यांनी विधिमंडळात याबाबत फोटो झळकवत बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांचे खंडन करण्यासाठी आता खुद्द मुख्यमंत्र्यांनाच पुढे यावे लागले आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीतही विरोधकांना आयताच मुद्दा मिळाला आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com