Eknath Khadse News : 'भाजपमध्ये नड्डांपेक्षा फडणवीस अन् महाजन मोठे नेते...'; खडसे असं का म्हणाले?

Eknath Khadse On Devendra Fadnavis And Girish Mahajan : 'काही अडचणींमुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या अडचणी आजही कायम आहेत.भाजपाला गरज नसेल तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे,मी या ठिकाणी आमदार आहे,चार वर्ष आमदार राहणार आहे.'
Eknath Khadse Devendra Fadnavis Girish Mahajan.jpg
Eknath Khadse Devendra Fadnavis Girish Mahajan.jpgSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : राष्ट्रवादी काँग्रेसने विधान परिषदेची आमदारकी दिल्यानंतरही लोकसभा निवडणुकीआधी एकनाथ खडसेंनी एका रात्रीत दिल्ली गाठत 'घरवापसी'चे संकेत दिले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यासोबतचे फोटोही त्यांनी सोशल मीडियावर टाकले. एवढंच नव्हे तर सून रक्षा खडसे यांचा प्रचारही केला.मात्र,अद्यापही खडसेंना भाजपने अधिकृत एन्ट्री दिलेली नाही.

त्याचमुळे निराश झालेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) पक्षाला इशाराही दिला.आता त्यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे. त्यांनी भाजपमध्ये जे.पी.नड्डा यांच्यापेक्षा देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन हे दोन मोठे नेते आहेत अशी खोचक टीका केली आहे.

विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी गुरुवारी (ता.5)मीडियाशी संवाद साधला.यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केलं. यात त्यांनी त्यांच्या रखडलेल्या भाजपप्रवेशावरही प्रतिक्रिया दिली.ते म्हणाले, काही अडचणींमुळे मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या अडचणी आजही कायम आहेत.भाजपाला गरज नसेल तर माझा मूळ पक्ष काय वाईट आहे,मी या ठिकाणी आमदार आहे,चार वर्ष आमदार राहणार आहे असंही विधान खडसे यांनी यावेळी केलं.

भाजपमध्ये जे.पी. नड्डा यांच्याहस्ते आपला प्रवेश झाला होता,तो त्यांनी जाहीर करायला पाहिजे होता.मात्र, गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोध केल्याने तो जाहीर झाला नाही.याचा अर्थ जेपी नड्डा यांच्यापेक्षा भाजपमध्ये हे दोन्ही नेते मोठे आहे असे दिसते असा आरोपही आमदार खडसेंनी यावेळी केला.

Eknath Khadse Devendra Fadnavis Girish Mahajan.jpg
Sheetal Mhatre On ShivsenaUBT: ‘सिल्व्हर ओक’ने आवाज चढवला, ‘मातोश्री’चा चेहरा पडला…; शिंदे गटाचा जिव्हारी लागणारा घाव

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. यावरही एकनाथ खडसे बोलले. ते म्हणाले,अनिल देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात उभं राहणार अशी चर्चा आहे.आपल्या विरोधी लोकांना राजकीय हेतूने संपविण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे. अनिल देशमुख दबावाने काम करत असतील तर ते राजकीय व्यक्ती आहेत,

मात्र, अधिकाऱ्याने कोणत्याही दबावाला बळी न पडता काम करायला हवे होते,कोणीही दबाव आणला तरी नियमाने काम करणे हे अधिकाऱ्याचे काम होते,अनिल देशमुख यांच्या दबावाला बळी पडून काम करणारा अधिकारी दोषी आहे,राजकीय परिस्थिती बदलत आहे तसं प्रशासकीय वातावरण बदलत आहेत.

आपला भाजपप्रवेश गिरीश महाजन आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे होऊ शकला नसल्याचा आरोप खुद्द खडसेंनी केला आहे. यावर गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, एकनाथ खडसे यांचं मला समजत नाही, ते कधी सांगतात अमित शाह यांच्याहस्ते प्रवेश झाला. कधी सांगतात जे. पी. नड्डा यांच्याहस्ते प्रवेश झाला. वरिष्ठांनी जर त्यांचा प्रवेश केलेला आहे, तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण आहोत? उगाच आमचं नाव घालायचं आणि सोयीचं राजकारण करायचं अशा शब्दांत महाजन यांनी खडसेंना फटकारलं आहे.

भाजपमध्ये आहे की राष्ट्रवादीमध्ये आहेत? हेच मला कळत नाही असं खडसेच सांगत आहेत. सून आली की, मी बीजेपीचे काम करतो. आता पोरगी आली तर मी राष्ट्रवादीचे काम करतो असं सगळं सुरू आहे. पण तुम्ही जर म्हणतात की, मी रक्षा खडसेंचं काम केलं तर मग शरद पवार तुम्हाला राजीनामा का मागत नाहीत? असा खडा सवालही गिरीश महाजन यांनी खडसेंना केला आहे.

Eknath Khadse Devendra Fadnavis Girish Mahajan.jpg
Mahayuti News : शिंदे गट-राष्ट्रवादीत खटक्यावर खटके; फडणवीसांची झोप उडवणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com