Sheetal Mhatre On ShivsenaUBT: ‘सिल्व्हर ओक’ने आवाज चढवला, ‘मातोश्री’चा चेहरा पडला…; शिंदे गटाचा जिव्हारी लागणारा घाव

Mahavikas Aaghadi Chief Minister : निवडणुकीनंतर संख्याबळावरच मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडला जाईल, असा स्वच्छ निर्वाळा माननीय पवारसाहेबांनी दिल्यानंतर उबाठाचा ‘फेस’ फेसबुकवर येण्या इतक्याही लायकीचा राहिला नाही अशी ठाकरे गटाच्या जिव्हारी लागणारी पोस्ट केली आहे.
Mahavikas Aaghadi.jpg
Mahavikas Aaghadi.jpgSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्यात यावा, बिनचेहऱ्याचं सरकार अजिबात चालणार नाही, अशी भूमिका शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊतांनी मांडली होती.एव्हाना दिल्लीत काँग्रेस पक्षश्रेष्ठींसमोरही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवण्याबाबत आग्रही भूमिका मांडली होती.

मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच्या संख्याबळावर मविआचा मुख्यमंत्री ठरवण्यात येईल असं विधान केले आहे. त्यामुळे एकप्रकारे ठाकरेंची मागणी धुडकावून लावल्याचे बोलले जात आहे.यावरुन आता शिंदे गटाच्या महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटाला डिवचलं आहे.

...आणि चेहरा काळाठिक्कर पडला!

शिंदे गटाच्या आक्रमक महिला नेत्या शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरील X या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. यात त्यांनी उद्धव ठाकरे गटावर खोचक टिप्पणी केली आहे. त्या पोस्टमध्ये म्हणतात, ‘सिल्व्हर ओक’ने आवाज चढवला, ‘मातोश्री’चा चेहरा पडला. चेहरा ठरवा..चेहरा ठरवा... असा धोशा लावणाऱ्या उबाठाचे तोंड काळे पडले.

निवडणुकीनंतर संख्याबळावरच मुख्यमंत्री (Chief Minister) पदाचा चेहरा निवडला जाईल, असा स्वच्छ निर्वाळा माननीय पवारसाहेबांनी दिल्यानंतर उबाठाचा ‘फेस’ फेसबुकवर येण्या इतक्याही लायकीचा राहिला नाही अशी ठाकरे गटाच्या जिव्हारी लागणारी पोस्ट केली आहे.

तसेच सुंठीवाचून खोकला गेला,या म्हणीनुसार काँग्रेस नेतृत्वाला आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत !कारण निवडणूक जाहीर होण्याआधीच उबाठाचा पत्ता कट झाला आहे असाही टोला शीतल म्हात्रे यांनी सोशल मीडियावरुन ठाकरे गटाला लगावला आहे.

Mahavikas Aaghadi.jpg
State Cabinet Meeting : आता माघार नाही...! शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 9 धडाकेबाज निर्णय

महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीपूर्वी ठरवायचा की निवडणुकीनंतर यावरून चढाओढ सुरू असल्याचं दिसून येत आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतील सर्व पक्षाने एकमताने मुख्यमंत्री पदाचा चेहरा निवडावा अशी भूमिका घेतली आहे.

यामुळे निवडणुकीमध्ये त्याचा फायदा होईल असं ठाकरे यांचं म्हणणं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली असून त्या भूमिकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सहमती दर्शवली आहे.

Mahavikas Aaghadi.jpg
Solapur Politics : महाआघाडीत वाद पेटणार; सोलापुरात राष्ट्रवादीच्या चार मतदारसंघांवर काँग्रेसने सांगितला हक्क

शरद पवार काय म्हणाले होते..?

शरद पवार यांनी कोल्हापूरमध्ये मीडियाशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांनी मविआच्या मुख्यमंत्रि‍पदावर भाष्य केले. ते म्हणाले, मुख्यमंत्रि‍पदाचं घोडे कुठेही अडलं नाही.निवडणुकीनंतर संख्याबळावर नेतृत्वाबाबत निर्णय घ्यायचा असतो. अजून कशाचाही पत्ता नाही.महाविकास आघाडीला बहुमत मिळेल,असं वातावरण आहे.पण,मुख्यमंत्रि‍पदाबाबत आताच मांडणी करण्याची आवश्यकता नाही असंही पवार यांनी यावेळी सांगितले.

यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना प्रश्न विचारला. ते म्हणाले, शरद पवार बोलले ते बरोबरच आहे. निवडणुकीनंतर कोणाचं किती संख्याबळ आहे. त्यानुसारच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरवणं योग्य ठरणार आहे. मात्र, याबाबत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा निर्णय जाहीर करण्याच्या मागणीबाबत आधीच बोलून झालंय आहे,असं म्हणत पटोले यांनी पवारांच्या वक्तव्याला सहमती दर्शवली आहे.

Mahavikas Aaghadi.jpg
BJP Politics in Harayana : भाजपमध्ये चाललंय काय? तिकीट कापल्यानंतर माजी मंत्री ढसाढसा रडल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com