
Pune rave party : पुण्यातील खराडी भागात स्टे बर्ड हॉटेलमध्ये रविवारी झालेल्या एका रेव्ह पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. यात एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यामुळे राजकीय वर्तुळात या प्रकरणाची चर्चा आहे. त्या नंतर आता एकनाथ खडसे यांनी पत्रकारपरिषद घेत याप्रकरणी पोलिस तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
खडसेंनी पोलिस यंत्रणेला काही सवाल उपस्थित केले. ते म्हणाले, ज्या ठिकाणी संगीत नाही, गोंधळ किंवा आदळआपट नाही. डान्स नाही. एका घरात सातजण बसले आहेत, आणि त्यांची पार्टी सुरु आहे. याला रेव्ह पार्टी म्हणता का? रेव्ह पार्टीची नेमकी व्याख्या काय? याला जर रेव्ह पार्टी म्हणत असतील तर महाराष्ट्रात प्रत्येक घरात असे पाच-सहा जण पार्टी करायला बसले तर त्यालाही रेव्ह पार्टी म्हणावं लागेल असं खडसे म्हणाले.
खडसेंनी यावेळी पोलिसांच्या कार्यपद्दतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले पोलिसांनी रेव्ह पार्टीची व्याख्या सांगावी. या प्रकरणाला जाणीवपूर्वक रेव्ह पार्टी असं म्हणून बदनाम करण्याचं प्रयोजन काय? पोलिसांना काय अधिकार आहे की कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यातील व्हिडीओ, फोटो सार्वजनिक करावे. पोलिसांनी ते मीडियाला दिले. पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे. पोलिसांना चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही, महिलांचे तर अजिबातच नाही. परंतु या प्रकरणात पोलिसांनी महिलांचे व पुरुषांचे फोटो दाखवले. पोलिसांनी बदनामी करण्याचे सूत्र यामागे ठेवलं.
याप्रकरणात डॉ. प्राजंल खेवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय? त्यांच्यावर कुठलाही गुन्हा दाखल नसताना त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे असं पोलिस प्रेसमध्ये सांगण्यात आलं. त्यांच्यावर आजवर आयुष्यात एकही गुन्हा दाखल नाही. ते गुन्हेगारी प्रवृत्तीचे नाही. वैद्यकीय क्षेत्रातील नावाजलेलं नाव आहे. तरीही पोलिसांनी अशाप्रकारे त्यांना बदनाम केलं.
वास्तविक अमली पदार्थ एका महिलेच्या बॅगमध्ये सापडले. त्या महिलेला प्रमुख आरोपी करायला पाहीजे होतं. परंतु प्रांजल यांना पोलिसांनी लक्ष्य केलं. प्रत्यक्षात त्यांनी कोणताही अमली पदार्थ बाळगलेला नव्हता. परंतु वारंवार या प्रकरणात प्रांजल खेवलकर यांचं नाव घेतलं कारण ते एकनाथ खडसे यांचे जावई आहेत. हे पूर्णपणे खडसे कुटुंबाला बदनाम करण्यासाठी केलेलं कृत्य आहे. हे केवळ ड्रग्ज पार्टीचे प्रकरण नाही तर, आमच्या कुटुंबावर डाग लावण्याचे षडयंत्र असल्याचे खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.