Raver Loksabha : नाथाभाऊंनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले; रावेरमधून निवडणूक लढण्याची तयारी

Mahavikas Aghadi News : काँग्रेस पक्षाची हार ही मोठ्या मतांच्या फरकाने झालेली आहे.
Eknath Khadse
Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली. पक्षाने मला तिकीट दिलं, तर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे रावेर लोकसभा मतदारसंघाचे शिवधनुष्य उचलण्याची आपली तयारी आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले. (Eknath Khadse ready to contest Lok Sabha election from Raver)

रावेर लोकसभेची जागा काँग्रेस पक्ष १९८९, ९१, ९६, ९७, ९८, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ मध्येही हरला आहे. रावेरमध्ये गेल्या अनेक निवडणुकांत काँग्रेस पक्ष हरत आलेला आहे. काँग्रेस पक्षाची हार ही मोठ्या मतांच्या फरकाने झालेली आहे. ते २०१४ मध्ये साडेचार लाख, तर २०१९ मध्ये तीन लाख मतांच्या फरकाने हरले आहेत, असे खडसे यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Khadse
Maharashtra Politics : महायुतीच्या आमदारांची ‘वर्षा’वर खलबतं; मुख्यमंत्री देणार कानमंत्र

ते म्हणाले की, आमची काँग्रेस पक्षाला ही विनंती आहे की, एक वेळ ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला द्यावी. तुम्ही जवळपास दहा निवडणुका या तीन ते चार लाख मतांच्या फरकाने हरला आहात. त्यामुळे आता रावेरमधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावे, असा आमचा आग्रह आहे.

जागावाटपाचा निर्णय हा इंडिया आघाडीच्या बैठकीत होईल. याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली, तर पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल, असेही ही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, रावेर लोकसभा मतदारसंघातून गेल्या दोन निवडणुकांमध्ये खडसे यांच्या सूनबाई रक्षा खडसे या भाजपच्या तिकिटावर निवडून आल्या आहेत. खडसे स्वतः भाजपमध्ये होते. मात्र, भाजपमध्ये होणाऱ्या कोंडीला कंटाळून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता त्यांनीच रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे.

Eknath Khadse
Kolhapur Water Supply Issue : कोल्हापूरच्या थेट पाइपलाइनच्या मुख्य वीजपंपाची वायर कापली; घटनेमागे राजकारण असल्याची चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत जळगावमध्ये मेळावा झाला होता. त्या मेळाव्यात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाचा विषय छेडला होता. रावेर लोकसभेचं शिवधनुष्य आता नाथाभाऊंनी उचलावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार खडसे यांनी रावेरमधून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी दाखवली आहे.

Eknath Khadse
Bidri Sugar Factory Election : कोल्हापूरच्या राजकारणात चमत्कार; ‘बिद्री’च्या छाननीवेळी कट्टर विरोधक बसले मांडीला मांडी लावून

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com