Eknath Shinde News :'एरियल फोटोग्राफी करून पोट भरत नाही' शिंदेंनी ठाकरेंना डिवचले

Loksabha Election : ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख करंजकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी केले शिंदे गटात स्वागत. शिवसेना बाळासाहेब ठाकरे येत्या निवडणुकीत मोठा विजय संपादित करेल असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama

CM Shinde VS Thackrey: आज ठाकरे गटाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आज शिंदे गटात प्रवेश केला. या पदाधिकाऱ्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले. शिवसेना बाळासाहेब ठाकरे येत्या निवडणुकीत मोठा विजय संपादित करेल असा दावा त्यांनी केला.

लोकसभा निवडणूक प्रचार आणि ठाकरे गटातील पदाधिकार्‍यांचे स्वागत मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज झाले. यावेळी विविध कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते विश्वासाने शिंदे गटात आले आहेत. त्यांना कोणीही खोक्याचे आश्वासन दिलेले नाही. मात्र हे सर्व उद्धव ठाकरे यांना समजणार नाही. कारण त्यांना कार्यकर्त्यांची किंमत नाही असे ते म्हणाले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पक्षातील निष्ठावंत नेते आणि कार्यकर्ते यांची किंमत नाही. कोणीही आपल्यापेक्षा मोठा झालेला त्यांना आवडत नाही. एखाद्याने चांगले भाषण केले तर, पुढच्या कार्यक्रमात भाषणाच्या यादीत त्याचे नाव नसते. या पक्षात सध्या मालक आणि नोकर अशी स्थिती निर्माण करण्यात आली आहे. त्यामुळे अनेक कार्यकर्ते ठाकरे गटाला सोडून जात असल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या संघटन कौशल्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रश्न उपस्थित केला. ते म्हणाले, चाळीस आमदार आणि तेरा खासदार माझ्याबरोबर आले आहेत. आज महाराष्ट्रातील हजारो कार्यकर्ते शिवसेना बाळासाहेब ठाकरे या पक्षात प्रवेश करीत आहेत. माझ्यावर विश्वास व्यक्त करीत आहेत. हे सगळ्यांना कुठलेही आमिष म्हणून नाही किंवा खोके म्हणून नाही तर कार्यकर्ता म्हणून किंमत दिली जात असल्याने ते माझ्याकडे येतात. आमच्या पक्षात 'राजा का बेटा राजा' नव्हे तर काम करणाऱ्याला सन्मान दिला जातो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Eknath Shinde
Nagar News: 'युपीच्या कामगारांना आमचेच संरक्षण', योगींनी नगरमध्ये पाऊल ठेवण्याआधी लंकेंची टोलेबाजी

उद्धव ठाकरे यांच्यामुळे शिवसेना (Shivsena) कधीही स्वबळावर महाराष्ट्रात सत्तेत आलेली नाही. भविष्यातही येण्याची शक्यता नाही. अशी टीका शिंदे यांनी केली. ते म्हणाले, 'जो कार्यक्षम असेल, कर्तुत्वान असेल त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जातो. राज ठाकरे (Raj Thackeray), नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक अशी कितीतरी नावे घेता येतील. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना स्टेजवरून खाली उतरवण्यात आले. अशी स्थिती रामदास कदम यांची करण्यात आली. ठाकरे गटात कार्यकर्त्याला अपमान आणि संपवण्याचे कारस्थान केले जाते. एकमेकांमध्ये झुंजवले जाते. त्यामुळे उद्धव ठाकरे कधीही स्वबळावर सत्तेत येणार नाही.

सध्याची निवडणूक ही देशाची निवडणूक आहे, असे शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली कितीतरी पक्ष एकत्र आले आहेत. मोदी यांच्या नेतृत्वामुळे आज देशाचे जगभर नाव घेतले जात आहे. देशाचा विकास करायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पर्याय नाही. सबंध महाराष्ट्रात आणि देशात आज हीच हवा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी हा विचार लक्षात ठेवून हेमंत गोडसे (Hemant Godse) यांना मतदान करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि खासदार हेमंत गोडसे दोघांचीही एकाच वेळी हॅट्रिक होईल, यात कुठेही शंका नाही.यावेळी पालकमंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, श्री करंजकर, उपनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख बंटी तिदमे, माजी मंत्री बबन घोलप यांसह विविध नेते उपस्थित होते. Loksabha Election 2024

Eknath Shinde
Lok Sabha Election 2024 : बारामतीत मतदानाचा टक्का घसरला, राष्ट्रवादीनं चंद्रकांतदादांवर फोडलं खापर? अजितदादांचीही खदखद बाहेर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com