TET paper leak : "TET पेपर फुटीचं ठाणे कनेक्शन, कोणाचा तरी फडणवीसांच्या पदावर डोळा..." खडसेंचा थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा?

Eknath Shinde Operation Tiger : "मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावध होण्याची गरज आहे. कारण कोणाचा तरी मुख्यमंत्री पदावर डोळा आहे. त्यामुळे फडणवीस यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. ऑपरेशन टायगर राबवून सहा खासदार फोडण्यात आले. माध्यमातून राज्यात आपल्या पक्षाला नंबर एक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे."
Eknath Shinde-Devendra Fadnavis
Eknath Shinde-Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News, 28 Jun : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगर राबविले. विकास निधी आणि अन्य दबाव या माध्यमातून उद्धव ठाकरेंच्या सहा खासदारांना फोडले. मात्र यावरून आता वेगळेच राजकारण सुरू झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनी ऑपरेशन टायगर विषयी गंभीर विधान केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध होण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांनी टार्गेट केले. खडसे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला. टीईटी परीक्षेचा पेपर फुटल्याने त्यांनी ठाणे कनेक्शनचा उल्लेख केला आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांच्या राजकारणावर खडसे यांनी टीकास्त्र सोडले.

त्या म्हणाल्या, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सावध होण्याची गरज आहे. कारण कोणाचा तरी मुख्यमंत्री पदावर डोळा आहे. त्यामुळे फडणवीस यांनी वेळीच सावध झाले पाहिजे. ऑपरेशन टायगर राबवून सहा खासदार फोडण्यात आले. माध्यमातून राज्यात आपल्या पक्षाला नंबर एक करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Eknath Shinde-Devendra Fadnavis
Om Rajenimbalkar : उद्धव ठाकरेंची धाराशिवमध्ये सभा अन् इकडे ओम राजेनिंबाळकर शनिचरणी; श्रीकांत शिंदे अन् श्रीरंग बारणे देखील सोबत...

त्या दृष्टीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. या मागे त्यांचा त्यांचा हेतू काय? हे समजून घेतले पाहिजे. टीईटी परीक्षेचे पेपर फुटण्याचा देखील खडसे यांनी थेट एकनाथ शिंदे यांच्याशी संबंध जोडला आहे.

पेपर फुटण्यावरून आधीच वातावरण तापलेले आहे. या स्थितीत पुन्हा पेपर फुटला आहे. त्याचे ठाणे कनेक्शन हे देखील गंभीर आहे. यामागे राज्यातील सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न तर नाही ना? असा प्रश्न त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com