Eknath Shinde : नाशिकच्या 'त्या' आंदोलकांना बघितलं, अन् एकनाथ शिंदेंही आवाक् झाले

Nashik Adivasi protest : सरकारच्या निर्णयाला विरोध म्हणून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुरु केलेल्या नाशिकमधील बिऱ्हाड आंदोलनाला तब्बल ८५ दिवस पूर्ण झाली आहेत. आजून हे आंदोलन सुरु आहे.
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी नाशिकमध्ये होते. त्यांच्या उपस्थितीत शिवसेना बूथप्रमुख कार्यशाळा व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. शिंदे यांच्या दौऱ्यादरम्यान नाशिकमधील बिऱ्हाड आंदोलकांनी त्यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. मात्र त्यांना पाहताच उपमुख्यमंत्री शिंदे देखील चकित झाले. त्याला कारणही तसच आहे...

आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत खासगी कंपनीमार्फत भरती प्रक्रिया सुरू आहे. रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याविरोधात रोजंदारी तत्वावरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तब्बल ८५ दिवसांपासून नाशिकच्या आदिवासी आयुक्तालयासमोर आंदोलन सुरु आहे.

या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर प्रश्न घेऊन आंदोलक उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीसाठी ठाण्यात गेले होते. त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर हा प्रश्न मार्गी लागेल, असे वाटले. पण अद्याप त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. आदिवासी मंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळीकडे या आंदोलकांनी दरवाजे ठोठावले पण कुणीही त्यांचा प्रश्न सोडवला नाही.

Eknath Shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी त्र्यंबकेश्वरमधील 'ते' शुल्क रद्द केलं ; म्हणाले, 'दात कोरुन पोट भरत नाही'

या आंदोलकांनी रविवारी पुन्हा जेव्हा मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली. तेव्हा ते चकित होऊन म्हणाले..अरे तुमचे आंदोलन आजून संपलेले नाही. दादा भुसेंना ते म्हणाले, भुसे साहेब हा प्रश्न आपल्याला येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडावा लागेल. येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आदिवासी विकास विभाग या विषयावर हा विषय घेणे महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले व बिऱ्हाड आंदोलक उपस्थित होते.

या बिऱ्हाड आंदोलकांनी थेट आदिवासी आयुक्तालयासमोर आपलं बिऱ्हाड मांडलं. तात्पुरत्या स्वरूपाचे पाल उभारुन हे आंदोलन सुरु आहे. येथेच या आंदोलकांसाठीचे दोन वेळचे जेवण बनवणे जाते. रस्त्यावरच जेवणाच्या पंगती बसतात. ऊन, वारा, पाऊस झेलत हे आंदोलन गेल्या ८० दिवसांपासून सुरु आहे.

Eknath Shinde
Nashik Police News: आदिवासी युवकाच्या खून प्रकरणाला धक्कादायक वळण, आईनेच घरात लपवल्याचा दावा.

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह स्थानिक आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर यांनी या आंदोलनावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करुनही यश आलेलं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबरोबर ३ ऑगस्टला बैठक झाली मात्र ती बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे आता या आंदोलकांसाठी कोण मध्यस्थी करणार असा प्रश्न पडला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com