Dindori Exit Polls Result 2024 : दिंडोरीत राम कृष्ण हरी वाजवा तुतारी?

Dindori Lok Sabha Election 2024 : दिंडोरी मतदारसंघात कांदा निर्यात बंदी हा शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न होता. त्यामुळे कांदा कोणाच्या डोळ्यात पाणी आणणार? हे 4 जून रोजी स्पष्ट होईल.
bharati pawar | bhaskar bhagare
bharati pawar | bhaskar bhagare sarkarnama

Bhaskar Bhagre Vs Bharati Pawar : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ( Dindori Lok Sabha Constituency ) भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे लढत आहेत.

हा मतदारसंघ विविध कारणांनी देशभर चर्चेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Narendra Modi ) रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी ( Nitin Gadkari ) तसेच काँग्रेसने ते राहुल गांधी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह विविध नेत्यांच्या या मतदारसंघात सभा झाल्या.

लोकसभा निवडणुकीचा एक्झिट पोल शनिवारी जाहीर झाला. या एक्झिट पोलनुसार दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार डॉक्टर पवार यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे ( bhaskar Bhagare ) आघाडीवर आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कांद्याचे आगार असलेल्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीच्या आवारात सभा घेतली होती. या सभेत एका कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या भाषणादरम्यान 'कांदा या विषयावर बोला' असा प्रश्न उपस्थित केला होता.

bharati pawar | bhaskar bhagare
Eknath Shinde : भाजपचे महाराष्ट्रातील '45 प्लस'चे स्वप्न भंगणार, मग शिंदेंचे मुख्यमंत्रीपद शाबूत राहणार?

दिंडोरी मतदारसंघात कांदा निर्यात बंदी हा शेतकऱ्यांसाठी अतिशय गंभीर आणि अस्वस्थ करणारा प्रश्न होता. भारतीय जनता पक्षाने केंद्रात सत्तेत असूनही याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अवमान केला, अशी भावना मतदारांमध्ये होती. ती मतदानात प्रकट झाले असे बोलले जाते.

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. पवार यांनी या मतदारसंघात विविध विकासकामे केली आहेत. एक प्रबळ उमेदवार म्हणून त्या चर्चेत होत्या. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भास्कर भगरे या अतिशय सामान्य शिक्षकाला उमेदवारी दिली होती. भगरे यांच्यासाठी मतदारसंघातून अनेक नागरिकांनी वर्गणी जमा करून आर्थिक सहाय्य केले. त्यामुळे या मतदारसंघाचा निकाल चर्चेचा विषय ठरणार आहे.


( Edited By : Akshay Sabale )

bharati pawar | bhaskar bhagare
Raver Lok Sabha exit polls news today: रक्षा खडसे हॅटट्रिक साधणार; रावेरमध्ये ‘खडसे’नावामुळे तिसऱ्यांदा संधी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com