Nashik Central Constituency : शिवसेनेने दावा केलेल्या नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेसचे पाच दावेदार!

Nashik Congress Politics : नाशिक शहर काँग्रेस बैठकीत पाच इच्छुकांनी पक्षाकडे उमेदवारीसाठी दावा केला आहे. या दाव्यामुळे काँग्रेस पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे.
Nashik Congress
Nashik CongressSarkarnama

Nashik Congress Vs Shivsena UBT: आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू आहे. या संदर्भात काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीत शहरातील तीनही मतदार संघांवर पक्षाने दावा केला आहे.

शहरातील नाशिक मध्य मतदार संघ यंदा अत्यंत प्रतिष्ठेचा बनला आहे. या मतदारसंघात शिवसेनेने जोरदार तयारी केली आहे. असे असतानाच काँग्रेसच्या या परंपरागत मतदार संघात पक्षाच्या पाच इच्छुकांनी उमेदवारीसाठी दावा केला आहे.

या दाव्यामुळे काँग्रेस(Congress) पक्षात उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार आहे. त्याबरोबरच महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक शहरातील मतदारसंघांवरून चांगलाच तणाव वाढू शकतो. त्यामुळे आगामी राजकीय हालचाली गतिमान होण्याची चिन्हे आहेत.

गुरुवारी झालेल्या काँग्रेस पक्षाच्या बैठकीत माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांनी उमेदवारीसाठी आपला अर्ज दाखल केला. याशिवाय युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस व माजी नगरसेवक राहुल दिवे, अल्पसंख्यांक आघाडीचे अध्यक्ष हनीफ बशीर, प्रा. भालचंद्र पाटील आणि प्रा. आदिनाथ नागरगोजे यांनी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारीसाठी अधिकृतपणे अर्ज सादर केले आहे.

Nashik Congress
Sharad Aher : काँग्रेस नेते शरद आहेर म्हणाले, "किमान दोन इच्छुकांनी तरी उमेदवारी मागावी"

नाशिक मध्य मतदार संघात सध्या भाजपच्या प्राध्यापिका देवयानी फरांदे(Devyani Farande) विद्यमान आमदार आहेत. त्यांच्या विरोधात पक्षातही काही इच्छुक आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आमदार फरांदे यांच्या पुढे मोठे आव्हान निर्माण केले आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भद्रकाली येथील मतदान केंद्रावर त्याचे चित्र दिसून आले. शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांनी गेले अनेक दिवस येथे निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. भाजपचा एक गट देखील गीते यांच्या संपर्कात आहे.

शहरातील सर्वात मोठ्या मल्टीस्टेट बँक असलेल्या नामको बँकेत माजी आमदार वसंत गीते(Vasant Gite) यांच्या नेतृत्वाखालील नुकतेच विजयी झाले. त्यामुळे शहराच्या बाजारपेठ आणि अन्य भागात गीते यांचा चांगला प्रभाव आहे. गीते यांच्याकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रबळ उमेदवार म्हणून पाहिले जाते.

Nashik Congress
Lakshmi Tathe : शिंदे गटातील बडतर्फ नेत्याकडून गांजाची तस्करी, तेलंगणा पोलिसांकडून अटक

अशा स्थितीत गेल्या दोन निवडणुकांमध्ये या मतदारसंघात पराभूत झालेल्या काँग्रेसने इच्छुकांना प्रोत्साहित करण्याचे धोरण ठेवले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात नाशिक मध्य मतदारसंघ कोणाचा यावरून चांगलीच ओढातान होण्याची चिन्हे आहेत. पाच इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने काँग्रेस पक्षातही उत्साहाचे वातावरण आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com