Sanjay Kute News: संयम संपला! हवालदिल शेतकऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल; थेट भाजप आमदाराचं घर जाळण्यासाठी धावला

Jalgaon News : आधीच शेती पिकांचे भाव कोसळल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. राज्यातील अनेक जिल्ह्याला मे महिन्याच्या अखेरीस अतिमुसळधार पावसानं झोडपलं.
Bjp Mla Sanjay Kute
Bjp Mla Sanjay Kute Sarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : आधीच शेती पिकांचे भाव कोसळल्यानं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. राज्यातील अनेक जिल्ह्याला मे महिन्याच्या अखेरीस अतिमुसळधार पावसानं झोडपलं. या पावसानं हातातोंडाशी आलेलं पिक हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांना (Farmers) मोठा फटका बसला.

या सरकारी पातळीवर अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याची प्रक्रिया पूर्ण करुनही मोठा कालावधी उलटला तरी हवालदिल शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. याचदरम्यान,जळगावातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे.

जळगाव जिल्ह्यातील जामोद येथे शुक्रवारी (ता.13) धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या पिकांची नुकसानभरपाईचा वारंवार पाठपुरावा करुनही सरकारी आर्थिक मदत न मिळाल्यामुळे एका शेतकऱ्याने थेट भाजप आमदार संजय कुटे (Sanjay Kute) यांचंच घर जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

याप्रकरणी आता संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर येथील शेतकरी विशाल मुरुड याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार,अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकरी मुरुड यानं शुक्रवारी थेट संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या परिसरात एन्ट्री घेतली.

Bjp Mla Sanjay Kute
Mumbai Elections: संकटांनी घेरलेल्या ठाकरेंसमोर नवं आव्हान, मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत होणार 'RSS'ची एन्ट्री; असं फिरवणार राजकारण?

यानंतर त्यानं आपल्याला अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई न मिळाल्यामुळे आमदारांचा बंगला जाळून टाकतो,असं वक्तव्य केलं. धक्कादायक बाब म्हणजे विशाल मुरुडच्या हातात असलेल्या पेट्रोलच्या कॅनसह तो थेट आमदार संजय कुटे यांच्या निवासस्थानाच्या गेटकडे धावला.

महत्त्वाची बाब म्हणजे ही घटना घडली तेव्हा भाजप नेते आणि आमदार संजय कुटे निवासस्थानी उपस्थित होते. एकीकडे राज्यातील कायदा सुरक्षेच्या व्यवस्थेवरुन सातत्यानं विरोधकांकडून टीकेची झोड उठवली जात असतानाच दुसरीकडे आता थेट आमदाराचं घरच जाळण्याचा प्रयत्न झाल्यानं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

Bjp Mla Sanjay Kute
Mahayuti government ward order : 'स्थानिक' निवडणुकांना नवीन अडथळा, प्रभाग रचनेला खंडपीठात आव्हान; नोटिसा निघाल्या, काय निर्णय होणार?

भाजप आमदार संजय कुटे यांच्या स्वीय सहायकांनी यावेळी प्रसंगावधानता बाळगून शेतकरी विशाल मुरुड हे बंगल्याच्या गेटकडे धाव घेतली असतानाच त्यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. याप्रकरणी पोलिसांनी पीडित शेतकरी विशाल मुरुड यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू आणि अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या उत्तमरित्या पार पाडण्यात डॉ.संजय कुटे यांचा हातखंडा आहे. ते जळगावमधील जामोद मतदारसंघातून मागील 20 वर्षांपासून आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत. भाजपचा एक अभ्यासू,तडफदार नेते म्हणून कुटे यांना महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com