Uddhav Thackeray : जिल्हाप्रमुख पद नाकाराल्याने उद्धव ठाकरेंची साथ सोडली, माजी महापौर आता एकनाथ शिंदेंचा धनुष्यबाण हाती घेणार

Dhule Politics News : उत्तर महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसणार आहे. धुळे महापालिकेचे माजी महापौर व पक्षाचे सहसंपर्कप्रमुख साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत चालले आहेत.
Eknath Shinde-Uddhav Thackeray
Eknath Shinde-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Dhule Politics : धुळे शहरातील राजकारणात एक मोठे वलय असणारे व धुळे महापालिकेचे प्रथम महापौर भगवान करनकाळ यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पत्रकारपरिषद घेत तशी माहिती दिली आहे.

माजी महापौर तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्कप्रमुख भगवान करनकाळ यांनी सांगितले की, आपण १२ मार्च रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्व पदाचा व सहसंपर्कप्रमुख पदाचा राजीनामा दिला असून उपमुख्यमंत्री व शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पुढील वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

करनकाळ म्हणाले, २०१६ ते २०२६ या दहा वर्षांच्या काळात मी शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केले. मात्र गेल्या तीन वर्षांपासून मला जिल्हाप्रमुख पदाची अपेक्षा होती. पद मिळाल्यानंतर जिल्ह्यात पक्षाचे संघटन मजबुत करण्याचा इरादा होता. परंतु या पदासाठी माझ्या नावाला पक्षांतर्गतच काहींनी विरोध केला. पक्षश्रेष्ठींनी देखील दुर्लक्ष केलं. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी देखील माझ्या नावाचा विचार पक्षाने केला नाही. महापालिकेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न केले. मात्र पक्षाकडून कोणतीही मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Jalna Municipal Corporation News : जालना महापालिकेत स्थायी समिती सभापदी पदावर दिग्गजांच्या शर्यतीत अशोक पांगारकरांची सरशी!

त्यांनी चार दशकांतील राजकीय व सामाजिक प्रवासाचा आढावा मांडला. यात १९८५ ला समाजकारणात प्रवेशानंतर याच वर्षांत ७ ऑगस्टला राजकारणात प्रवेश केल्याचे सांगितले. दहा वर्षे काँग्रेस, सात वर्षे भाजपमध्ये असताना केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली. नंतर २००३ ला शिवसेनेत (उबाठा) प्रवेश केला. यात महापौर, तसेच नंदुरबार लोकसभा जिल्हा संघटक, धुळे जिल्हा शिवसेना संघटक आणि सहसंपर्कप्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde-Uddhav Thackeray
Free Electricity for Farmers : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! दिवसा 12 तास मोफत वीजपुरवठा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

एमआयएममध्ये जाईल पण भाजप नको

दरम्यान भाजपत जाण्याचा देखील पर्याय समोर असताना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शेवसेनेचीच का निवड केली. असा सवाल केला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, माझी भाजपमध्ये जाण्याची मुळीच इच्छा नाही. एकवेळ मी एमआयएममध्ये प्रवेश करेन, पण भाजपमध्ये जाणार नाही. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन चर्चा केली असून, लवकरच प्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com