Jalgaon Crime : दारूच्या नशेत वाद आणि क्षणात चॉपरचे वार… माजी महापौर पुत्राकडून मित्राची हत्या

Raj Sapkale Jalgaon, murder case : माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राज ऊर्फ बाबू याने किरकोळ कारणावरुन आपल्या मित्राचाच खून केला. याप्रकरणी पोलिसांनी तिघा मारेकऱ्यांना अटक केली.
Crime News
Crime News Sarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Crime : किरकोळ कारणांवरुन खून आणि गोळीबाराच्या घटना ताज्या असतानाच जळगावात आणखी एका खुनाची भर पडली आहे. शहरातील गेंदालाल मिलमधील एका तरुणाचा (ता. भुसावळ) येथे चॉपरने वार करून खून करण्यात आला. ही घटना रविवारी (ता. ५) रात्री अकराच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरात कुटुंबासह वास्तव्यास असलेला जितेंद्र साळुंखे हा जळगावच्या माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राज ऊर्फ बाबू व त्याच्या दोन साथीदारांसमवेत भुसावळ तालुक्यातील कंडारी येथे एका कामानिमित्त गेला होता. तिथे एका हॉटेलवर मद्यपान केल्यानंतर त्यांच्यात वाद झाला. हॉटेलमधून निघून कंडारीजवळ तिघांनी जितेंद्रला मारहाण केली, तर राज सपकाळे याने चॉपरने सपासप दोन वार करून त्याचा खून केला. त्यानंतर मारेकरी तेथून फरार झाले.

कंडारी येथे झालेल्या चॉपर हल्ल्यात जितेंद्र साळुंखे याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत फॉरेन्सिक पथकाने पुरावे संकलन करून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशयितांच्या मागावर रवाना केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या काही तासात तिघा संशयितांच्या मुसक्या आवळल्या.

Crime News
Eknath Shinde : नाशिकच्या 'त्या' आंदोलकांना बघितलं, अन् एकनाथ शिंदेंही आवाक् झाले

नेमकं काय घडलं?

जितेंद्र हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा राज ऊर्फ बाबू अशोक सपकाळे, मयूर ऊर्फ विकी दीपक अलोने (वय ३२, रा. शिवाजीनगर) यांचा मित्र आहे. रविवारी (ता. ५) सुटी असल्याने तिघा मित्रांनी जेवणाचा बेत आखला आणि ते तिघेही भुसावळला गेले.

Crime News
Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी त्र्यंबकेश्वरमधील 'ते' शुल्क रद्द केलं ; म्हणाले, 'दात कोरुन पोट भरत नाही'

तिघांसोबत दीपक वसंत शंकपाळ (कंडारी, ता. भुसावळ) असे चौघे भुसावळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बिअर बारमध्ये मद्यपान करीत असताना जितेंद्र काहीतरी पुटपुटला. त्यातून बाबू सपकाळे व त्याच्यात शाब्दिक वाद झाला. वादानंतर चौघे हॉटेलमधून निघून कंडारीकडे जात असताना, रस्त्यात पुन्हा वाद होऊन बाबू ऊर्फ राज सपकाळे याने कंबरेचा चॉपर काढून त्याच्यावर एकामागून एक असे दोन वार केले. चॉपरचे खोलवर वार झाल्याने जितेंद्र खाली कोसळला. त्याला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात नेले. तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर करताच चौघांनी पळ काढला. त्यानंतर तिघा मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com