Dhule News : भाजपने काढली राहुल गांधींची प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

धुळे शहरात खासदार राहुल गांधी यांच्याविरोधातील आंदोलनात सहभागी भाजपचे आंदोलक.
BJP agitaion in Dhule
BJP agitaion in DhuleSarkarnama

धुळे : (Dhule) ओबीसी समाज, (OBC) तेली समाजाचा अवमान करणारे आणि सुरत न्यायालयाकडून (Court) दोषी ठरविण्यात आलेले, शिक्षा सुनावलेले खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा निषेध, धिक्कार केला जात आहे. या निषेधार्थ शहरात खासदार गांधी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून दहन करण्यात आल्याची माहिती आंदोलक भाजपने (BJP) दिली. (Dhule Bjp aggressive on Congress leader Rahul Gandhi)

BJP agitaion in Dhule
Malegaon News; संजय राऊत मालेगावला, दादा भुसे काही दिसेना!

दोन दिवसांपूर्वी विधीमंडळात भाजपच्या काही सदस्यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन केले होते. त्यावर टिका झाल्यावर असे आक्षेपार्ह आंदोलन होऊ नये अशी अपेक्षा भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली होती. त्यानंतर धुळे शहरात ज्येष्ठ लोकप्रतिनिधी व नेत्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन झाले.

BJP agitaion in Dhule
Uddhav Thackeray In Malegaon : उद्धव ठाकरेंची तोफ आज मालेगावमध्ये धडाडणार : कुणाकुणाचा घेणार समाचार?

भाजपचे शहर- जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रतिभा चौधरी, उपमहापौर नागसेन बोरसे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप कर्पे, जयश्री अहिरराव, मनपा सभापती किरण कुलेवार, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर या ज्येष्ठ नेत्यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले.

यावेळी श्री. अग्रवाल म्हणाले, खासदार गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करत ओबीसी समाज आणि तेली समाजाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजपतर्फे खासदार गांधी यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली.

BJP agitaion in Dhule
Sudhir Mungantiwar News : सुधीर मुनगंटीवारांनी शिंदे गटाला सुनावलं; म्हणाले, ''जागावाटपाचा फॉर्म्युला टीव्हीवर...''

त्यानंतर गांधी पुतळ्याजवळ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. खासदार गांधी यांनी मोदी आडनावावरून पंतप्रधान मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. या प्रकरणात सुरत न्यायालयाने खासदार गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने त्यांची खासदारकी रद्द केली आहे.

या आंदोलनात महिला कार्यकर्त्यांनी गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. खासदार डॉ. सुभाष भामरे म्हणाले, काँग्रेस नेते गांधी हे देशद्रोही आहेत. आक्षेपार्ह वक्तव्यातून त्यांनी ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. या समाजाचा अवमान कदापी सहन करणार नाही.

BJP agitaion in Dhule
Nashik News; `मनसे`खडसावले, ‘ऑक्सिजन' हवाय ‘कार्बन' नको!

यावेळी महिला बालकल्याण सभापती सारिका अग्रवाल, हिरामण गवळी, विजय पाच्छापूरकर, यशवंत येवलेकर, चंदू गुजराथी, भिकन वराडे, महिला जिल्हाध्यक्षा मायादेवी परदेशी, अजय अग्रवाल, शीतल नवले, विनोद थोरात, ओम खंडेलवाल, देवेंद्र सोनार, गजेंद्र पिंपळकर, चेतन मंडोरे, महादेव परदेशी, बबन चौधरी, प्रशांत बागूल, जीवन शेंडगे, नंदू सोनार, हर्षकुमार रेलन, अमोल मासुळे, अरुण पवार, भगवान गवळी, शशी मोगलाईकर, ॲड. रोहित चांदोडे, विकी परदेशी, मयूर सूर्यवंशी, भीमसिंग राजपूत आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com