Ganesh Gite BJP : राहुल ढिकलेंचा गमछा गणेश गितेंच्या गळ्यात, पक्षप्रवेशावेळी असं काय घडलं ज्याची सर्वत्र चर्चा..

Ganesh Gite joins BJP with public support from Rahul Dhikle : विधानसभा निवडणुकीत गणेश गिते यांनी बंडखोरी करत भाजपच्या राहुल ढिकले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी दोन्ही गटात मोठा वाद झाला होता.
Ganesh Gite joins BJP
Ganesh Gite joins BJPSarkarnama
Published on
Updated on

Ganesh Gite joins BJP : विधानसभा निवडणुकीत गणेश गिते यांनी बंडखोरी करत भाजपच्या राहुल ढिकले यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी दोन्ही गटात मोठा वाद झाला होता. मात्र गुरुवारी (ता. ३) मुंबईतील प्रवेश सोहळ्यात आमदार ढिकले यांच्या उपस्थितीतच गणेश गिते यांनी भाजपमध्ये कमबॅक केलं.

गणेश गितेंच्या पक्षप्रवेशावेळी असं काही घडलं की त्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचं झालं असं की, गणेश गितेंचा पक्षप्रवेश सोहळा होत होता त्यासाठी पक्षाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना गिते यांच्या गळ्यात घालण्यासाठी भाजपचा गमछा (उपरणे) हवे होते. यावेळी कुठे गमछा दिसत नाही म्हटल्यावर तत्काळ राहुल ढिकले यांनी आपल्या गळ्यातील गमछा काढून तो पक्षाध्यक्ष रवीद्र चव्हाण यांच्याकडे दिला. चव्हाण यांनी तोच गमछा गणेश गिते यांच्या गळ्यात घालून त्यांचे पक्षात स्वागत केले.

विधानसभेला ढिकले यांनी गिते यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा गिते यांच्या भाजपमध्ये पुनरागमनाची चर्चा सुरु झाली. मात्र गिते यांना पुन्हा पक्षात घेण्यास ढिकले यांच्यासह त्यांच्या गटाचा विरोध होता. ढिकले यांच्यासह अनेकांनी गिते यांना पुन्हा पक्षात घेतल्यास राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. मात्र गिरीश महाजन यांनी मध्यस्ती करत हा प्रवेश घडवून आणला.

Ganesh Gite joins BJP
Girish Mahajan Politics: गिरीश महाजन यांच्या मनात आहे तरी काय? निष्ठावंतांच्या उमेदवारीचा भार आता आमदारांवर?

विशेष म्हणजे राहुल ढिकले स्वत:प्रवेश सोहळ्याला हजर होते. त्याहुन अधिक आश्चर्य म्हणजे गितेंच्या स्वागताला ढिकले यांनी आपल्या गळ्यातील पक्ष चिन्ह असलेले उपरणे काढून दिले. त्याचवेळी प्रवेश सोहळ्यानंतर ढिकले यांनी माध्यमांशी बोलताना सुप्त इशाराही दिला. ते म्हणाले, माझ्या मतदारसंघातील निष्ठावंतांवर अन्याय होऊ देणार नाही. निश्चितच पक्षातील जुन्यांना प्रथम न्याय देणार अशी भूमिका त्यांनी मांडली.

Ganesh Gite joins BJP
Maharashtra Politics : 2 जुलैची आठवण सांगितली, अजित पवारांच्या नाराज आमदाराने बोलून दाखवली मंत्रीपदाची इच्छा

राहुल ढिकले यांच्या विरोधामुळे गिते यांचा प्रवेश रखडला होता. तीन ते चार वेळा त्यांचा प्रवेश ठरुन पुन्हा रद्द झाला त्यालाही तेच कारण होतं. मात्र आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने दिलेला शंभर प्लसचा आकडा भाजपला गाठायचा आहे. त्यामुळे गितेंना पक्षात घेणं पक्षश्रेष्ठींना महत्वाचं वाटत होतं. त्यामुळे त्यांनी ढिकले यांची समजूत काढली व ढिकले तयार झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com