Kishor Darade On Vivek Kolhe : विवेक कोल्हेंना होमग्राऊंडवर येऊन घेरलं; 'आमदार दराडेंनी, काय काय सांगितलं...'

Vivek Kolhe allegation of Nashik Teachers Vidhan Parishad MLA Kishore Darade : नाशिक शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्‍न सोडवून कोणताही स्पर्धक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरला नाही. त्यामुळे साखर सम्राटांमध्ये भिती निर्माण झाली आहे. यातून माझ्यावर आरोप होत असल्याचे आमदार किशोर दराडे यांनी म्हटले.
Kishor Darade
Kishor Daradesarkarnama
Published on
Updated on

Kishor Darade News : नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक आरोप-प्रत्यारोपाने गाजू लागली आहे. आमदार किशोर दराडे यांनी विवेक कोल्हे यांचे नाव न घेता सर्वच काढलं आहे. डमी उमेदवारापासून ते सरकारकडून 117 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून सरकारची फसवणूक केली. प्रतिस्पर्धी उमेदवारांकडे काहीच शिल्लक नसल्याने साखर सम्राटांमध्ये भिती निर्माण झाल्याचे सांगत आमदार किशोर दराडे यांनी विवेक कोल्हे यांना घेरलं.

महायुतीतील शिवसेना (Shiv Sena) एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन विरोधी उमेदवाराने त्यांच्याभोवती केलेल्या कारस्थानांची माहिती दिली. गेल्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रान्वये असलेले गुन्हे न्यायप्रविष्ट असून, त्यानंतर कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. डमी उमेदवाराचे कोणत्याही प्रकारे दबाव टाकून अथवा अपहरण केले गेले नाही.

सर्वाधिक शिक्षकांचे प्रश्‍न सोडवून कोणताही स्पर्धक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उरला नसल्याने साखर सम्राटांमध्ये भिती निर्माण झाली आहे. यातून माझ्यावर आरोप होत असल्याचे आमदार किशोर दराडे यांनी म्हटले.

Kishor Darade
Radhakrishna Vikhe On Congress : काँग्रेसकडून 'खटाखट' घ्या; मंत्री विखेंनी ठोकला शड्डू!

आमदार दराडे म्हणाले, "डमी उमेदवार कोपरगावचा होता. विरोधकांनी त्याला 15 लाख रुपये व नोकरीचे अमिष दाखवून उमेदवारीचा अर्ज भरण्यास लावला. ते जवळच्या नात्यात असल्याने त्यांचे अपहरण केलेले नाही. पोलिसांनी त्या व्यक्तीला घरी सोडले. याबाबत कोणतीही तक्रार नाही".

आरोप करणाऱ्या साखर सम्राटांनी येवलेला साखर कारखाना होऊ दिला नाही. कोपरगावपासून 18 किलोमीटरवर असलेल्या येवला येथे कारखाना झाला असता तर, त्यांचा कारखाना बंद पडला असता. येवलेकरांना त्यांनी नेहमीच त्रास दिला. आरोप करणाऱ्यांनी सरकारकडून 117 एकर जमीन स्वतःच्या नावावर करून सरकारची फसवणूक केल्याचा गंभीर आरोप देखील दराडे यांनी केला.

Kishor Darade
Vivek Kolhe : विवेक कोल्हेंचा आरोपांचा 'अग्निबाण'; 'सरकारी पाहुण्यांनी आता 'त्यांच्या' गुन्ह्यांची...'

ही शिक्षक मतदार संघाची निवडणूक आहे, साखर कारखान्याची नाही. डमी उमेदवार देऊन दिशाभूल करण्याइतपत शिक्षक अज्ञानी नाही. नाशिक शिक्षक मतदार संघात काम मोठ्या प्रमाणात केल्याने, विरोधकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. यासाठी ते शिक्षकांची दिशाभूल करत असल्याचे सांगत आमदार दराडे यांनी विवेक कोल्हेंचा समाचार घेतला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com