Girish Mahajan Viral Photos : 'तिला वडील नाहीत, तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर'; तरुणीसोबतच्या व्हायरल फोटोंवर गिरीश महाजनांचा खुलासा

Girish Mahajan Viral Photos : सोशल मीडियावर मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीसोबत कथित आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले. त्यावर आता स्वत: मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारपरिषद घेऊन खुलासा केला आहे.
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : भाजपचे संकटमोचक म्हणून ओळख असलेले व राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे शुक्रवारी सोशल मीडियावर एका तरुणीसोबतचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर आता स्वतः गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे.

या फोटोंसदर्भात आपण सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. त्यानंतर हे मूळ फोटो नसून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेले बनावट फोटो असल्याचे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर महाजन यांनीही रविवार (दि. २१) नाशिक येथे पत्रकारपरिषद घेऊन यासंदर्भात सविस्तरपणे खुलासा केला.

पत्रकार परिषदेमध्ये बोलताना गिरीश महाजन यांनी आपल्या कुटुंबाचे मूळ फोटो दाखवत संपूर्ण प्रकार समोर आणला. मूळ फोटोंमध्ये छेडछाड करुन(क्रॉप करुन) हे फोटो बनवण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ती मुलगी माझ्या दिवंगत मित्राची मुलगी असून तिच्या लग्नाची जबाबदारी माझ्यावर आहे असं महाजन यांनी सांगितलं.

Girish Mahajan
Girish Mahajan: मंत्री गिरीश महाजन यांच्या नावाने व्हिडिओ व्हायरल; AI की कटकारस्थान? सायबर पोलिसांची थेट फेसबुकला नोटीस, तपास सुरू

या संदर्भात अधिक खुलासा करताना महाजन यांनी सांगितलं की, ती मुलगी माझ्या मित्राची मुलगी असून तिचे वडील आज हयात नाहीत. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. महाजन म्हणाले मी काही फोटो दाखवतो, त्यांच्या फॅमिलीसोबतचे, गणपती किंवा इतर ठिकाणचे. माझ्या मुलीसोबतते मुंबईत येतात, मात्र तेच फोटो व्हायरल केले जात आहेत. सेल्फी फोटो सोशल मीडियावरून व्हायरल केले जात आहेत. त्यात काही फोटो सेल्फी आहेत, काही फोटो क्रॉप केले आहेत, तिथे माझी पत्नी, मुली आहेत.

AI चा वापर करून हे फोटो बनवले असून तेच व्हायरल केले जात आहेत. या मागे राजकारण असून अशामुळे काहींना आयुष्यातून उठावं लागेल, अशी परिस्थिती आहे. जाणीवपूर्वक असे फोटो व्हायरल केले जात आहेत. यासंदर्भात मी सायबर सेलमध्ये तक्रार दिली आहे. त्याचं सर्टिफिकेट मला मिळालं आहे असं महाजनांनी सांगितलं.

मी मुख्यमंत्र्यांशी देखील याबत बोललो आहे. ही परिस्थिती खूप गंभीर असून यावर कारवाई केली जाईल, असा मला विश्वास आहे. यात कोण आहे याची मला कल्पना नाही. परंतु यावर राजकारण सुरू आहे. त्या मुलीचं लग्न जमवायचं आहे, ती जबाबदारी माझ्यावर आहे, हे चुकीचं केलं जात आहे. आपण राजकारण करतो, त्यात दोन हात करू. मात्र, हे जाणीवपूर्वक केलं जात असल्याचा आरोप महाजनांनी केला.

Girish Mahajan
गिरीश महाजनांचा नादच खुळा, पाहा 'स्पीड बोट' कशी फिरवली गरागरा

एका कुटुंबाची व आपली सामाजिक बदनामी करणाऱ्यांना अजिबात सोडणार नाही, असा इशारा महाजनांनी दिला. या प्रकरणी मी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. फोटो व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे सांगत गिरीश महाजन यांनी काही कौटुंबिक फोटो प्रसारमाध्यमांना दाखवले, ज्यामध्ये त्यांचे संपूर्ण कुटुंब आणि ती संबंधित मुलगी एकत्र दिसत असल्याचे त्यांनी दाखवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com