Jalgaon Politics News : मुक्ताईनगरातील गौणखनिज प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी एकनाथ खडसे यांच्यासह कुटुंबातील सदस्यांना १३७ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. त्यांनी केलेली चोरी उघड झाली आहे. त्यांनी त्याचे उत्तर द्यावे. उगाच आमच्या नावाने खडे फोडू नयेत, असा टोला राज्याचे ग्रामविकासमंत्री व भाजप नेते गिरीश महाजन यांनी लगावला आहे.
जामनेर येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, 'मुक्ताईनगरातील गौणखनिजाची रॉयल्टी न भरल्याप्रकरणी त्या ठिकाणचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनी एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार एसआयटीतर्फे चौकशी करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना गौणखनिज काढून रॉयल्टी न भरल्याप्रकरणी १३७ कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. एकनाथ खडसे यांनी त्या ठिकाणी जमीन खरेदी केली, त्या ठिकाणी रस्त्याचे काम सुरू होते. त्या जमिनीवर असलेला डोंगर त्यांनी फोडला आणि रस्त्याच्या कामासाठी तो मुरूम दिला. परंतु त्याची रॉयल्टी कुठेही भरलीच नाही. त्यामुळे एसआयटी चौकशी होऊन त्यांना १३७ कोटी रुपये दंडाची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता खडसे यांनी कुठे गेला तो माल, रायल्टी का भरली नाही? याचे उत्तर द्यावे.'
'खडसे त्यानी या नोटीसला अद्याप कोणतेही उत्तर दिले नसल्याचे सागंण्यात येत आहे. एकनाथ खडसे म्हणतात मी स्वच्छ आहे, मी एक रुपया कुणाचाही खात नाही. त्यामुळे त्यांनीच आता उत्तर द्यावे हे गौणखनिज कुठे गेले, एवढा मोठा डोंगर पोखरून उंदीर नाही घेऊन गेले? या प्रकरणी एकनाथ खडसे यांना अगोदर कारणे दाखवा नोटीसही दिली गेली होती. मात्र, त्यांनी त्याचे उत्तरच दिले नाही. चोऱ्या खडसे करतात आणि आमच्या नावाने ते खडे फोडत असतात', अशी टीका गिरीश महाजन यांनी केली.
'भोसरी जमीन खरेदी प्रकरणात सर्व उलटे सुलटे प्रयोग तुम्ही केले. एवढी मोठी दोनशे कोटीची जमीन तुम्ही हडप केली. तीस कोटी रेडिरेकनर असताना तीन कोटींत खरेदी केली आणि आम्हाला दोष देता आहात. त्यामुळे त्यांनी आमच्यावर तोंडसुख घेण्यापेक्षा कागदोपत्री हे सिद्ध करावे, यातच त्यांचे भले आहे. खडसे यांच्या परिवारातील लोकांचे या दंड आकारण्यात नावे आहेत. मात्र, यात बोलविता धनी एकनाथ खडसेच आहेत', असा आरोप महाजन यांनी केला.
'एखाद्या शेतकऱ्याने एखाद्या ठिकाणाहून दोन-तीन ब्रास मुरूम काढला, तर त्याला दंड आकारतात. तुम्ही तब्बल १३७ कोटींचा माल चोरून घेवून गेले आणि परत टार्गेट करताहेत, असे तुम्ही म्हणताहेत. परंतु आता तुम्ही सिद्ध करा ही चोरी केली नाही. आम्ही माल काढला नाही. उगाच आमच्या नावाने खडे फोडू नका', असा टोलाही गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना लगावला.
Edited by : Sachin Fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.