Girish Mahajan : गिरीश महाजन यांनीही कोकाटेंच्याच पावलावर पाऊल ठेवलं, शेतकऱ्यांना दिला अजब सल्ला..

Following Manikrao Kokate, BJP leader Girish Mahajan gives strange advice to farmers : राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हे नेहमीच शेतकऱ्यांविषयी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. आता त्यावरुन चर्चा सुरु झाली आहे.
Girish Mahajan & Manikrao Kokate
Girish Mahajan & Manikrao KokateSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan : राज्याचे कृषीमंत्री व राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे हे नेहमीच शेतकऱ्यांविषयी केलेल्या विविध वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. अनेकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करुन शेतकऱ्यांचा रोष आपल्यावर ओढावून घेतला आहे. आता भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनीही त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत शेतकऱ्यांना अजब सल्ला दिला आहे. आता त्यावरुन चर्चा सुरु झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त शनिवारी जळगाव येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. महायुती सरकारने निवडणुकीच्या आधी कृषी कर्जमाफीची घोषणा केली होती. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जावी अशी मागणी होत आहे. त्यावर सरकारने केलेल्या इतर चांगल्या कामांकडे दुर्लक्ष करुन केवळ कर्जमाफीच्या मागे लागणे योग्य नसल्याचा सल्ला महाजन यांनी शेतकऱ्यांना दिला.

महाजन म्हणाले महायुती सरकारने केलेल्या विकासाकडे लक्ष द्या. नुसते कर्जमाफीच्या मागे लागू नका. शासनाकडून विकासाच्या चांगल्या योजना राबविल्या जात आहेत. रस्ते, पूल कसे चांगले होत आहेत, त्याकडेही जरा बघा, असा अजब सल्ला भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

Girish Mahajan & Manikrao Kokate
Chhagan Bhujbal : भुजबळांचा एकच इशारा अन् ते अतिक्रमण जमिनदोस्त, काय घडलं..?

यावेळी महायुती सरकारने कृषी कर्जमाफीची घोषणा करून शेतकऱ्यांना सत्ता आल्यानंतर कसे वाऱ्यावर सोडून दिले. हा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे वैतागलेल्या मंत्री महाजन यांनी कर्जमाफीच्या विषयाला बगल देत, शासनाच्या विविध योजनांची यादीच त्यांनी वाचून दाखवली. एवढ्या सगळ्या योजना सरकार राबवत असताना केवळ शेतकरी कर्जमाफी हा एकच मुद्दा घेऊन सरकारला कोंडीत पकडणे योग्य नसल्याचं महाजन म्हणाले.

यावेळी महाजन यांनी केंद्र सरकारच्या महिला, युवक, शेतकरी, दलित, आदिवासी, आणि ओबीसी घटकांसाठी राबवलेल्या विविध योजनांची माहिती दिली. जळगाव जिल्ह्यात सर्वात मोठे मेडिकल हबचे काम सुरु आहे. चिंचोली सर्वसामन्य नागरिकांना मोठ्या स्वरुपात सुविधा मिळणार आहेत. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना मोफत उपचार मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Girish Mahajan & Manikrao Kokate
Dada Bhuse : भुसे गुरुजींनी रात्रीची शाळा भरवली ; नाशिकच्या शिंदे सेनेतील वाद एकदाचा मिटवला, दोन्ही गट एकत्र

दरम्यान जळगाव महापालिकेत महायुती म्हणूनच लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. महापालिकेत सगळे काही चांगलेच होणार असल्याचे सूचक विधान महाजन यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com