Girish Mahajan : माझे कार्टून बनवले, मला लाकूडतोड्या म्हटले.. गिरीश महाजनांच्या लागलं जिव्हारी

Girish Mahajan On Tapovan tree cutting : तपोवनातील जागा साधूग्रामसाठी आरक्षित आहे. त्यामुळे ती जागा मोकळी करावी लागेल. कारण दुसरा पर्याय नाही असा पुनरुच्चार कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी केला.
Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News : तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींनी आंदोलन सुरु केले असून मंत्री महाजनांच्या भूमिकेवर संताप व्यक्त केला आहे. वृक्षप्रेमींनी गिरीश महाजन यांना लाकुडतोड्या संबोधले आहे. महाजनांना नाशिकची झाडे तोडून शहराचे तापमान जळगावच्या पातळीवर नेऊन ठेवायचे असल्याचाही आरोप त्यांच्यावर झाला. यानंतर आता त्यावर महाजन यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

एकीकडे वृक्षतोडीविरोधात पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरु आहे तर दुसरीकडे पुण्यातील अॅड. श्रीराम पिंगळे यांनी राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल केली असून 15 जानेवारीपर्यंत वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ही वृक्षतोड करता येणार असल्याचं हरित लवादाने म्हटले आहे. त्यामुळे महाजनांसमोरील पेच वाढला असून डॅमेज कंट्रोलसाठी त्यांनी प्रयत्न सुरु केल्याची चर्चा आहे.

पर्यावरण नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला विरोध होत असतानाच आज (दि. १५) नाशिकमध्ये 15 हजार वृक्ष लागवडीचा शुभारंभ मंत्री महाजनांच्या उपस्थितीत करण्यात आला. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, साधू-महंतांच्या उपस्थितीत मखमलाबाद परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी ही १५ हजार झाडे लावली जाणार असून पहिल्या टप्प्यात एक हजार झाडे लावली जात आहेत. या वृक्षरोपण कार्यक्रमाच्यावेळी मंत्री महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Girish Mahajan
Tapovan Controversy : गिरीश महाजनांकडून तपोवन वादाचे 'डॅमेज कंट्रोल', नाशिकमध्ये 1 हजार झाडे लावायला सुरुवात

गिरीश महाजन म्हणाले, तपोवनातील जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असे आरोप केले जात आहेत. विनाकारण असे आरोप करु नका. असे पाप कोण करणार? असे म्हणत गिरीश महाजन यांनी आरोप करणाऱ्यांना सुनावलं. ते पुढे म्हणाले, मागच्या कुंभमेळ्यात जशी व्यवस्था होती, तशीच व्यवस्था केली जाणार आहे. एकही नवीन राहुटी लावली जाणार नाही. मागील काही दिवसात तिथे झाडे, झुडुपे वाढलेली आहेत, ती तोडण्याचा विषय होता. मात्र, माझे कार्टून बनविण्यात आले. कुऱ्हाड घेऊन उभा आहे मी, लंगोटी बांधून. मला लाकूड तोड्या म्हटले गेले. पर्यावरणाचा ऱ्हास करताय असं म्हटलं गेलं. पर्यावरण प्रेमी, काही राजकीय संघटना यात उतरल्या. पण, मला त्याबाबत काही बोलायचे नाही असं ते म्हणाले.

आता तुम्ही सांगाल तेवढे झाडे लावणार, तुम्ही नाशिककर जोपर्यंत म्हणत नाही की आता बस झाले. तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. या वेळेचा कुंभमेळा आपल्याला आगळा-वेगळा करायचा आहे. मागील कुंभमेळ्यामध्येही तुम्ही माझे काम बघितले आहे. तसाच सुरक्षित व चांगला कुंभमेळा यावेळी आपण करणार आहोत असं महाजन म्हणाले.

Girish Mahajan
Nashik NMC Elections : नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरु, पहिल्याच दिवशी घराणेशाहीचे दर्शन

साधू गांजा पितात, असे जे बोलतात ते बोलणे अतिशय चुकीचे आहे. आम्ही सहिष्णु आहोत याचा अर्थ असं नाही की कुणी येऊन साधू-संतांचा अपमान करणार असतील तर ते खपवून घेतलं जाणार नाही असही त्यांनी सुनावलं. 15 हजार काय 25 हजार झाडे लावू. मी आमदार, नगरसेवकांना सांगितले की, तुम्ही जागा सांगा आपण झाडे लावू. ही झाडे सीएसआर फंडमधून लावली जात आहेत, अशी माहिती देखील महाजन यांनी दिली. एक झाड आईच्या नावावर लावा, असे आवाहन महाजन यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com