Tapovan Controversy : गिरीश महाजनांकडून तपोवन वादाचे 'डॅमेज कंट्रोल', नाशिकमध्ये 1 हजार झाडे लावायला सुरुवात

Girish Mahajan damage control Tapovan controversy : तपोवन वादात सर्वाधिक टीका मंत्री गिरीश महाजन यांच्यावर झाली. कारण महाजन हे कुंभमेळामंत्री असून त्यांचे वृक्षतोडीला समर्थन आहे.
Girish Mahajan damage control Tapovan controversy
Planting of trees begins in NashikSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये येणाऱ्या साधूमंहतांच्या राहण्याची सोय करण्यासाठी तपोवनात साधूग्राम उभारण्यात येणार आहे. परंतु त्यासाठी १८०० झाडे तोडली जाणार असल्याने त्याविरोधात पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरु आहे. एकही झाड तोडू देणार नाही अशी भूमिका पर्यावरणप्रेमेंनी घेतली आहे. कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्यावर पर्यावरणप्रेमींनी राग व्यक्त केला आहे. कारण महाजन यांचे या वृक्षतोडीला समर्थन आहे.

तपोवनातील वृक्षतोडीचा वाद दिवसेंदिवस आणखी वाढत चालला आहे. एकीकडे पर्यावरणप्रेमींचे आंदोलन सुरु आहे. दुसरीकडे वृक्षतोडीविरोधात अॅड. पिंगळे यांनी हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती, त्यावर लवादाने वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे. तर तिसरीकडे तपोवनातील मंदिरांना आरक्षणासंदर्भात बजावलेल्या नोटिसांच्या पार्श्वभूमीवर तिन्ही आखाडे न्यायालयीन लढाईसह आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.

या सगळ्यात कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची मोठी कोंडी झाली आहे. तपोवनातील वादात गिरीश महाजन हे पर्यावरणप्रेमींसह आखाड्यांच्या टार्गेटवर आहेत. पर्यावरणप्रेमेंनी तर यापूर्वी गिरीश महाजनांना लाकुडतोड्या म्हणून संबोधले आहे. अभिनेते सयाजी शिंदे यांनीही वृक्षतोडीवरुन महाजन यांना शिंगावर घेतलं आहे. त्यापार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचा मुहूर्त साधून एकप्रकारे तपोवन वादाचे डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न गिरीश महाजनांकडून केला जात असल्याचे दिसते.

Girish Mahajan damage control Tapovan controversy
Nashik NMC Elections : नाशिकमध्ये भाजपकडून इच्छुकांच्या मुलाखती सुरु, पहिल्याच दिवशी घराणेशाहीचे दर्शन

नाशिकमध्ये आज (दि. १५) पासून वृक्ष लागवड मोहीम सुरू करण्यात आली आहे. 'आपले नाशिक-हरित नाशिक' या संकल्पनेवर आधारित 'हरित नाशिक' मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे. नाशिकच्या मखमलाबाद परिसरातील कॅनॉल लगतच्या सर्व्हे नंबर ६९ या सुमारे अडीच एकर जागेवर तसेच गोदावरीच्या किनारी सुनियोजित प्रकल्पालगत एकत्रितपणे सुमारे एक हजार देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यास येत आहे.

Girish Mahajan damage control Tapovan controversy
Nashik Tapowan: नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीसंदर्भात मोठी अपडेट; राष्ट्रीय हरित लवादाचा महापालिका प्रशासनाला दणका

या वृक्षलागवडीच्या माध्यमातून कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून तपोवनातील वृक्षतोडीच्या वादावर समेट घडवून आणण्याचे प्रयत्न होत आहेत. आमचे सरकार पर्यावरणविरोधी नाही हे दाखवण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे. त्यासाठी आजपासून एक हजार वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. याशिवाय वृक्षरोपणासह विविध विकासकामांचा शुभारंभ देखील आज होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com