Girish Mahajan : संजय राऊत जवळ असताना उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरज नाही, मंत्री महाजनांचा टोला

Girish Mahajan on Sanjay Raut : भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत यांच्या दलालीमुळे उद्धव ठाकरे संपले असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.
Girish Mahajan & Uddhav Thackrey
Girish Mahajan & Uddhav ThackreySarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan on Sanjay Raut : भाजप नेते व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उबाठा खासदार संजय राऊत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. संजय राऊत यांच्या दलालीमुळे उद्धव ठाकरे संपले असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे. राऊतांनी ठाकरेंची शिवसेना शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर बसवली. त्यात जी दलाली तुम्ही केली तेवढी आजपर्यंत कुणी केली नसेल अशी टीका महाजन यांनी राऊत यांच्यावर केली आहे.

गिरीश महाजन पुढे म्हणाले, उद्धव ठाकरेंना त्यांचा पक्ष संपवण्यासाठी कोणत्याही राजकीय शत्रूची गरज नाही, कारण संजय राऊत हे एकटेच त्यासाठी पुरेसे आहेत. नाशिकमध्ये सुधाकर बडगुजरच नाही तर अनेकजण नाराज आहेत. आता जिल्ह्यात कुणीच उबाठा पक्षात राहण्यास तयार नाही. संजय राऊत जोपर्यंत पक्षात आहे, तोपर्यंत उद्धव ठाकरेंना अन्य शत्रूची गरजच नाही. कारण तेच पक्ष फोडण्याचं काम करत असल्याचा आरोप महाजन यांनी केला. राऊतसारख्या दलालांमुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अनेक नेते आणि कार्यकर्ते पक्ष सोडून गेल्याचे महाजन म्हणाले.

संजय राऊत यांना शिवसेना संपवायची होती म्हणूनच त्यांनी शिवसेनेला कॉंग्रेस व शरद पवार यांच्या दावणीला बांधलं. बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे सगळे विचार संपवले. राऊतांची बडबड बंद झाली नाही तर शिवसेना शिल्लकच राहणार नाही, उद्धवजींचं देवच भलं करो असं महाजन म्हणाले.

Girish Mahajan & Uddhav Thackrey
Eknath Shinde : शेवटी शिंदे- शिंदेंकडेच जाणार, एकनाथ शिंदेंच्या एका वाक्याने उद्धव ठाकरेंची झोप उडाली

ज्यादिवशी सरकार बदलेल त्या दिवशी सर्वात पहिले महाजन पक्ष सोडतील असं राऊत म्हणाले होते. त्यावरुनही महाजन यांनी राऊतांचा समाचार घेतला. ते म्हणाले, सर्वांना माहित आहे मी लहानपणापासून आरएसएसचा स्वयंसेवक आहे. तब्बल ३५ वर्ष झाले मी सातवेळा आमदार म्हणून निवडून येतो आहे. सर्वात सीनिअर मी आहे. माझ्या मनात हा विचार कधी आलाच नाही. सत्ता नसतानाही आम्ही वीस वर्ष विरोधात काम केलं.

राऊतांसारख्या बुरसटलेल्या लोकांच्या मनातच असले विचार येतात. आमच्या सारखे कार्यकर्ते एका विचाराणे प्रेरित झाले आहेत, आम्हाला कुठेही जायची गरज नाही. आम्हालाही अनेक आमिषे दाखवण्यात आली पण आम्ही आमचा विचार सोडला नाही असं महाजन म्हणाले.

Girish Mahajan & Uddhav Thackrey
Uddhav Thackeray : लग्न सोहळ्याच्या आडून शिंदे-फडणवीसांनी सोडले बाण, उद्धव ठाकरे घायाळ

दरम्यान महाजन व राऊत यांच्यात सद्या चांगलेच शाब्दिक युद्ध रंगले आहे. काल उद्धव ठाकरे यांचा पक्ष जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर आहे, काही दिवसांत ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार आहे असं विधान महाजन यांनी केलं होतं. त्यानंतर दोघांमध्ये अधिक झुंपली. शिवसेना संपवणं कुणालाही जमणार नाही असं राऊत म्हणाले. पक्ष फोडण्यासाठी गिरीश महाजन हे भाजपने नेमलेला दलाल आहे. महाजनांच्या दहा पिढ्या आल्या तरी आमचा पक्ष संपवू शकत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com