Girish Mahajan : जावयाच्या ठेक्याने पेटला कुंभमेळ्याच्या निधीचा वाद ; राऊतांच्या आरोपांना महाजनांचं ‘पुरावा दाखवा’ आव्हान

Girish Mahajan, Sanjay Raut, Kumbh Mela Fund : नाशिकमधील खड्ड्यांचा प्रश्न व कुंभमेळ्यातील कामांच्या ठेक्यावरुन संजय राऊत व गिरीश महाजन यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
Girish Mahajan & Sanjay Raut
Girish Mahajan & Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

Kumbh Mela Nashik : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्यात सध्या नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावरुन व कुंभमेळ्यातील कामांच्या ठेक्यावरुन चांगलाच कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

त्यात काल संजय राऊतांच्या नाशिकमधील मोर्चाच्या मुहुर्तावरच नाशिकचे पालकमंत्री म्हणून गिरीश महाजन यांची नियुक्ती झाल्याने राऊतांचा चांगलाच संताप झाल्याचे पाहायला मिळाले.

कालच्या जनआक्रोश मोर्चात संजय राऊत यांनी शहरातील कुंभमेळा कामांचे वाभाडे काढले. कुंभमेळा कामांचे बनावट कार्यादेश म्हणजे भ्रष्टाचाराचा ‘जामनेर पॅटर्न’ असल्याचा आरोप करत राऊत यांनी थेट मंत्री गिरीश महाजन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं.

आगामी कुंभमेळ्यासाठी ३५ हजार कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगितले जात आहे. यातील २७ कोटी रुपयांचा ठेका तर जामनेरच्या चौधरीला अर्थात गिरीश महाजानांच्या जावयाला देण्यात आला आहे. हा भ्रष्टाचाराचा 'जामनेर पॅटर्नच' सुरू असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला.

Girish Mahajan & Sanjay Raut
Girish Mahajan: गिरीश महाजनांचे राऊतांना थेट चॅलेंज; ‘जामनेर पॅटर्न’चा आरोप फेटाळत म्हणाले, 'ZPमध्ये ताकद दाखवा!'

सिंहस्थाच्या निमित्ताने नाशिक शहरासाठी आलेल्या पैशांचा हिशेब कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांना नाशिककरांना द्यावा लागेल. कुंभमेळ्यासाठी आलेले ३५ हजार कोटी रुपये कुणाच्या घशात गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. इतकच नव्हे तर, खड्ड्यांमुळे नाशिककरांचे बळी जाणे हे महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी केलेले खूनच आहेत. कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन आणि आयुक्त मनिषा खत्री यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा खासदार संजय राऊत यांनी दिला.

दरम्यान, संजय राऊत यांच्या या आरोपांवर कुंभमेळा मंत्री तथा नाशिकचे नवनिर्वाचित पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. एक रुपयाचं काम माझ्या जावयाला मिळाल्याचं राऊतांनी पुराव्यासह दाखवून द्यावं. हवेत आरोपांचा गोळीबार करू नका. त्यांनी कागद दाखवावा असे जाहीर आव्हान गिरीश महाजन यांनी केले आहे.

Girish Mahajan & Sanjay Raut
Girish Mahajan : महाजनांचे हात झटकण्याचे दिवस गेले! गळ्यात पालकमंत्रीपदाची माळ पडली, पण डोक्यावर काटेरी मुकुटही आला

गिरीश महाजन पुढे म्हणाले, त्यांच्याकडे एकही महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था राहिली नाही. आमदार, खासदार सोडून गेले. उद्विग्नपणातून ते हे आरोप करत आहेत. कोरोनामध्ये त्यांनी शेण खाल्लं. दहा रुपयांच्या वस्तू १० हजारांत घेतल्या. कुणाचे नातलग पकडले गेले, कुणाचे तुरुंगात गेले, सर्वांना माहीत आहे. आम्ही असे धंदे करत नाही. त्यांनी आम्हाला शिकवू नये असे प्रत्युत्तर महाजनांनी राऊतांना दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com