Girish Mahajan : गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर आनंद मावेना, १० वर्ष राजकारणापासून दूर राहिलेला तो नेता भाजपात दाखल

Girish Mahajan welcomes Manoj Chaudhary : जळगाव शहरात मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात अनेक स्थानिक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला. येणाऱ्या काळात आणखी काही प्रवेश होऊ घातल्याचे महाजन म्हणाले.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Politics : जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला राहीला असून गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात पक्षात इनकमिंग जोरात सुरु आहे. आगामी महापालिकेसह जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बळकटीकरणासाठी व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी रविवारी शहरात बैठक झाली. या कार्यक्रमात जिल्हातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला.

जळगाव महापालिकेत दोन टर्ममध्ये यश मिळवलेले माजी नगरसेवक मनोज दयाराम चौधरी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. तब्बल दहा वर्षांनंतर त्यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला व भाजपची वाट धरली. यानिमित्ताने त्यांनी आगामी महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत.

चौधरी हे सुरवातीला 'एनएसयूआय' व पर्यायाने कॉंग्रेसचे कार्यकर्ते होते. शिवसेनेचे नगरसेवक व त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या तिकिटावर त्यांनी जळगाव विधानसभेची निवडणूक लढली होती. परंतु निवडणुकीत पराभव झाल्याने ते राजकारणापासून अलिप्त राहिले. गेल्या १० वर्षांपासून ते राजकारणात सक्रिय नव्हते, आता भाजपात प्रवेश करत त्यांनी राजकारणात सक्रीय होण्याचा निर्णय घेतला.

Girish Mahajan
Chhagan Bhujbal : चुकीचं बोलणाऱ्या नेत्यांकडे लक्ष द्या, छगन भुजबळांचा सल्ला कुणाला?

चौधरी गेली दहा वर्षी राजकारणापासून काहीसे दूर असले तरी त्यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळे ते जनतेत लोकप्रिय राहिले आहेत. शिवाय स्थानिक पातळीवर पक्षाचे बळ वाढवण्यासाठी निश्चितच त्यांचा उपयोग पक्षाला होणार आहे. त्यांचा जनसंपर्क व अनुभव लक्षात घेता आगामी महापालिका निवडणुकीत ते भाजपचा बालेकिल्ला आणखी अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका ते बजावू शकतात. विशेषतः शहराच्या मध्यवर्ती भागात त्यांचा प्रभाव लक्षात घेता, निवडणुकीचे गणित बदलू शकते.

Girish Mahajan
Rajabhau Waje : शेतकरी 'राजा'साठी 'राजा'भाऊची केंद्राला साद, कांदाप्रश्नी पत्र धाडत केल्या 'या' दोन मागण्या..

याशिवाय रावेरच्या माजी नराध्यक्ष शीतल पाटील यांनी देखील आपल्या पती व सहकाऱ्यांसह भाजपात प्रवेश केला. इतरही अनेक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात भाजपचा गमछा आपल्या गळ्यात घातला आहे. येत्या काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत असून पक्षात होत असलेलं हे इनकमिंगमुळे पक्षाला बळकटी देणारं ठरणार आहे. येणाऱ्या काळात आणखी काही प्रवेश होणार असल्याची माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com