Godavari Pollution : प्रशासनात खळबळ, गोदावरी प्रदूषणाला कारणीभूत 119 अधिकारी रडारवर, मुख्य सचिवांनी हायकोर्टात नावे दिली !

Godavari River pollution case : गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने मोठी कबुली दिली असून, प्रदूषण रोखण्यात दिरंगाई करणाऱ्या १९९ अधिकाऱ्यांची नावे सादर केली आहेत.
Ramkund Nashik
Ramkund NashikFile Photo
Published on: 
Updated on: 

Godavari River Pollution Case: 199 Officials Named in Court Affidavit : गोदावरी नदी प्रदूषणप्रकरणी पर्यावरणप्रेमींनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी राज्याच्या मुख्य सचिवांनी प्रतिज्ञापत्राद्वारे नदी प्रदूषण रोखण्यात अपयशी ठरलेल्या विविध विभागांतील १९९ अधिकाऱ्यांची यादी न्यायालयात सादर केली.

या यादीत २०१२ पासून नाशिक महापालिकेत कार्यरत असलेले सर्व आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि गोदावरी संवर्धन कक्षाचे उपायुक्त यांचा समावेश आहे. तसेच २००९ पासून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील जॉइंट डायरेक्टर, प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकारी, फिल्ड ऑफिसर आणि एमआयडीसीच्या संबंधित अधिकाऱ्यांची नावेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आली आहेत.

अंबड आणि सातपूर येथील सांडपाण्यावर प्रक्रिया करणाऱ्या 'सीईटीपी'चे काम येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर पुढील ३ महिने त्याची चाचणी (Trial Run) घेतली जाईल आणि फेब्रुवारी अखेरपर्यंत हा प्रकल्प पूर्णपणे कार्यान्वित होईल, अशी माहिती शासनातर्फे देण्यात आली आहे.

अंबड-सातपूर येथे नवीन 'एसटीपी' उभारण्यासाठी किमान ३ वर्षे लागणार आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या अंदाजे २५० कोटी रुपयांच्या निधीपैकी २/३ वाटा एमआयडीसी (MIDC) ने आणि १/३ वाटा नाशिक महानगरपालिकेने (NMC) उचलण्याचे निर्देश मुख्य सचिवांनी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी दिले होते. मात्र, एमआयडीसीने हा निधी देण्यास स्पष्टपणे नकार देत तसे लेखी कळवले आहे.

यावर तात्पुरती उपाययोजना म्हणून, नंदिनी नदीचे पाणी गोदावरीला मिळण्यापूर्वीच अगरटाकळी एसटीपीकडे वळवत असल्याचे नाशिक मनपाने लेखी दिले आहे.

Ramkund Nashik
कुंभमेळा म्हणजे नेमकं काय? सिंहस्थ नावामागचं रहस्य जाणून घ्या!

याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, पावसाळ्यात (आणि आगामी कुंभमेळ्याच्या काळात) नंदिनी नदीचे पाणी अशा प्रकारे वळवणे शक्य नाही. त्यामुळे याचिकाकर्त्यांतर्फे पुढील मागण्या करण्यात आल्या.

-नदीच्या परिसरामध्ये "नदीचे पाणी मानवी वापरासाठी अयोग्य आणि आरोग्यासाठी घातक आहे" असे स्पष्ट करणारे मोठे फ्लेक्स बोर्ड तातडीने लावण्यात यावेत.

-किमान नंदिनी-गोदावरी संगम घाट, दसक घाट आणि ओढा घाट या ठिकाणी नदीच्या पाण्याचा वापर करण्यास, स्नान करण्यास आणि आचमन करण्यास त्वरित बंदी घालावी.

Ramkund Nashik
Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी 84 धार्मिक संस्थांची पडताळणी पूर्ण; 31 संस्थांनी मागितले साडेपाच कोटी, शासनाच्या निर्णयाकडे लक्ष!

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, मुख्य सचिवांनी या प्रकरणात आतापर्यंत जबाबदार असलेल्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची नावे न्यायालयात दिली आहेत. यात एकूण १९९ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. ज्यामध्ये,

नाशिक मनपा: २०१२ पासून आतापर्यंत कार्यरत असलेले सर्व आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि गोदावरी संवर्धन कक्षाचे सर्व उपायुक्त.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB): २००९ पासूनचे सर्व जॉईंट डायरेक्टर, सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकारी आणि फिल्ड ऑफिसर.

एमआयडीसी (MIDC): संबंधित प्रादेशिक आणि उपप्रादेशिक अधिकारी.

दरम्यान याप्रकरणाची पुढील सुनावणी ११ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.