

Rohini Khadse on Gokul Milk Union Politics : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’च्या राजकारणावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी भाष्य केलं आहे. सत्ताधाऱ्यांची सत्तेची भूक किती ? यांना भस्म्या झालाय का ? असा सवाल रोहिणी खडसे यांनी उपस्थितीत केला आहे.
राज्य सरकारने गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर 500 कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या संस्थेत पाच संचालक नामनिर्देशित करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या पॅनलनं 13 तर महायुतीच्या पॅनलनं 12 जागांवर विजय मिळवला होता. सतेज पाटील यांची सत्ता बसू नये यासाठी निर्णय घेतला गेला असल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
रोहिणी खडसे यांनी गोकुळच्या राजकारणावर एक्स'पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, कोल्हापूरच्या जनतेने गोकुळच्या निवडणुकीत यांच्या विरोधात कौल दिला आहे. तरी ज्यांची सत्ता गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे ते सत्ताधारी आज बळजबरीने गोकुळच्या खुर्चीवर दावा ठोकण्याचा प्रयत्न करत आहे. सत्तेच्या जोरावर संचालक मंडळाचे गणित बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सत्ताधारी किती रडके आहेत याचे हे आणखी एक उदाहरण आहे असे त्या म्हणाल्या आहेत.
निवडणुकीत पराभव झाला की तो स्वीकारण्याऐवजी नियम बदलायचे, शासनाचा वापर करायचा आणि सत्ता मिळवण्यासाठी वाट्टेल ते करायचे, सत्तेसाठी एवढी हपापलेली वृत्ती लोकशाहीला घातक आहे अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली आहे.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वातील पॅनलने 13 तर महायुतीच्या पॅनलने 12 जागांवर विजय मिळवला होता. गोकुळच्या नियमानुसार 25 पैकी 14 सदस्य सभेस उपस्थित असेल तर अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवड होऊ शकते.
मुंबई उच्च न्यायालयाने 10 नोव्हेंबरला अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यापूर्वी राज्य सरकारने 5 संचालक नेमण्याचा निर्णय घेतल्याने काँग्रेससह महाविकास आघाडीतून सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. त्याचाच भाग म्हणून रोहिणी खडसे यांनी सरकारवर टीका केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.