Gram Panchayat Election Results: नगर तालुक्यात शिवाजी कर्डिलेंचं वर्चस्व; तर नीलेश लंकेंचीही जोरदार एन्ट्री

Shivaji Kardile and Nilesh Lanke : अरणगावमध्ये चुरशीची लढत झाली, आमदार नीलेश लंके यांच्या गटाने येथे महायुतीचा धुव्वा उडवला.
Shivaji Kardile and Nilesh Lanke
Shivaji Kardile and Nilesh Lanke Sarkarnama
Published on
Updated on

प्रदीप पेंढारे :

Ahmednagar News: नगर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजणी पोलिस बंदोबस्तात पार पडली. नगर तालुक्यात आठपैकी निंबोडी व बारदरी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली होती, तर उर्वरित सहा ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. मतमोजणीनंतर नगर तालुक्यात माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले.

अरणगावमध्ये चुरशीची लढत झाली. आमदार नीलेश लंके यांच्या गटाने येथे महायुतीचा धुव्वा उडवला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे प्रतिबंब या निवडणुकांमध्ये पाहायला मिळाले. नगर तालुक्यातील निंबोडी आणि बारदरी गावची निवडणूक बिनविरोध झाली. येथे भाजपच्या कर्डिले गटाची सत्ता असल्याचा दावा होत आहे.

Shivaji Kardile and Nilesh Lanke
Gram Panchayat Elections Result : ''...यांनी फक्त टोमणे, आरोप-प्रत्यारोप एवढ्यावरच वर्ष घालवलं'' निकालावरून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटाला टोला!

हिंगणगाव येथे माजी सरपंच पोपट ढगे यांच्या पत्नी मनीषा यांनी सेवा संस्थेचे माजी उपाध्यक्ष दिलीप सिनारे यांच्या पत्नी हिराबाई यांच्यात (मते 817) सरपंचपदासाठी लढत रंगली होती. यात मनीषा यांनी 857 मते मिळवत विजय पटकाविला. हिंगणगावमध्ये ढगे यांचे चार सदस्य, तर सिनारे गटाचे पाच सदस्य विजयी झाले आहेत.

देऊळगाव सिद्धी येथे नगर बाजार समितीचे संचालक संजय गिरवले यांच्या पत्नी जयश्री आणि जिल्हा दूध संघाचे माजी अध्यक्ष दादाभाऊ चितळकर व बोरकर गटाच्या नूतन यांच्यात पारंपरिक लढत झाली. यात नूतन 1545 मतांनी विजय होत सरपंचपदावर विराजमान झाल्या. देऊळगावमध्ये बोरकर गटाचे आठ, तर गिरवले गटाचे तीन सदस्य विजयी झाले आहेत.

वडगाव गुप्ता येथे माजी सरपंच विजय शेवाळे यांच्या पत्नी सोनुबाई आणि माजी सरपंच भानुदास सातपुते गटाच्या ऋतुजा डोंगरे यांच्यात लढत रंगली होती. यात सोनूबाई शेवाळे यांनी सरपंचपदावर बाजी मारली. शेवाळे गटाचे 14 सदस्य विजयी झाले. वडगाव गुप्ता येथे अपक्ष उमेदवार दिलीप लक्ष्मण गव्हाणे हे विजयी झाले.

यांच्या विजयाची चर्चा अधिक होती. मेहकरी येथे माजी सरपंच संतोष पालवे यांच्या पत्नी विद्या आणि भाग्यश्री पालवे यांच्यात थेट लढत झाली. यात भाग्यश्री यांनी 1286 मते मिळवत विजय संपादन केला. पालवे गटाची ग्रामपंचायतीत एकहाती सत्ता आली. येथे पालवे गटाचे नऊ सदस्य विजयी झाले.

Shivaji Kardile and Nilesh Lanke
Gram Panchayat Election Results : नारायण पाटलांनी ३० वर्षांची सत्ता राखली अन्‌ मुलाला सरपंचही केले!

हिवरेझरे गावात बाजार समितीचे माजी उपसभापती भाऊसाहेब काळे आणि सुदाम रोडे यांच्यात सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाऊसाहेब काळे 720 मते मिळवत विजयी झाले. काळे गटाचे चार, तर रोडे गटाचे पाच सदस्य विजयी झाले आहेत.

अरणगाव येथे सरपंच पदासाठी सात उमेदवार रिंगणात होते. आमदार नीलेश लंके गटाचे पोपट पुंड यांनी चुरशीच्या लढतीत विजय मिळवला. पुंड गटाच्या ग्रामविकास पॅनेलचे सर्व 12 सदस्य ग्रामपंचायतीत निवडून आले आहे. बबन शिंदे गटाच्या तीन सदस्यांनी विजय मिळवला.

नगर तालुक्यात एकूण 80 ग्रामपंचायत सदस्य व आठ सरपंचांसाठी निवडणूक पार पडली. हिंगणगाव, हिवरेझरे, मेहेकरी, अरणगाव या चार गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये सत्ता परिवर्तन झाले. वडगाव गुप्ता व देऊळगाव सिद्धी येथे सत्ताधाऱ्यांनी सत्ता राखली आहे. हिंगणगाव, मेहेकरी, वडगाव गुप्ता, देऊळगाव सिद्धी येथे माजी आमदार कर्डिले व विखे गटाचे वर्चस्व राहिले. हिवरेझरे गावात ठाकरे शिवसेना गट, तर अरणगावात आमदार लंके गटाने सत्ता आणली.

सरपंच एका गटाचा, बहुमत दुसऱ्या गटाकडे...

नगर तालुक्यातील हिवरे झरे व हिंगणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच एका गटाचा, तर बहुमत दुसऱ्या गटाकडे गेले आहे. तसेच वडगाव गुप्ता येथे माजी सरपंच विजय शेवाळे गटाने एक हाती सत्ता मिळवली. येथे 15 पैकी एक अपक्ष उमेदवार दिलीप गव्हाणे यांनी बाजी मारली. दिलीप गव्हाणे यांच्या विजयाची चर्चा गावात रंगली आहे.

Edited By - Ganesh Thombare

Shivaji Kardile and Nilesh Lanke
Gram Panchayat Election Results: राजकारण तापलं; राम शिंदे अन् रोहित पवार गटाकडून विजयी सरपंचांवर दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com