Gram Panchayat Election Results : नारायण पाटलांनी ३० वर्षांची सत्ता राखली अन्‌ मुलाला सरपंचही केले!

Karmala Gram Panchayat Results : माजी आमदार नारायण पाटील यांनी जेऊर ग्रामपंचायतीवर १९९२ पासून असलेली सत्ता या वेळी कायम राखली आहे.
Karmala Gram Panchayat Election Results
Karmala Gram Panchayat Election Results Sarkarnama
Published on
Updated on

Karmala News : माजी आमदार नारायण पाटील यांनी जेऊर ग्रामपंचायतीवर १९९२ पासून असलेली सत्ता या वेळी कायम राखली आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे ग्रामपंचायतीची सत्ता राखतानाच नारायण पाटील यांनी मुलगा पृथ्वीराज पाटील यांनाही राजकारणात यशस्विपणे लाँच केले आहे. पृथ्वीराज पाटील यांनी सरपंचपदाच्या निवडणुकीत आमदार संजय शिंदे गटाचे नितीन खटके यांचा तब्बल १३२९ मतांनी पराभव करत राजकारणात दमदार एन्ट्री केली आहे. (Gram Panchayat Election Results : Former Shiv Sena MLA Narayan Patil continues to dominate Jeur Gram Panchayat)

करमाळा तालुक्यातील जेऊर ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील यांची १९९२ पासून म्हणजे तब्बल ३० वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे समर्थक आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीत पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील हे निवडून आले आहेत. पृथ्वीराज पाटील यांनी जेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Karmala Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Results : बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारच ‘दादा’; इंदापूरसह चार तालुक्यांतील ६४ पैकी ४२ ग्रामपंचायतींवर झेंडा

दरम्यान, शिंदे गटाचे माजी आमदार नारायण पाटील यांनी जेऊरसह राजुरी, केम, कंदर, चिखलठाण, कावळवाडी, भगतवाडी, रायगाव या ग्रामपंचायतींत विजय मिळाल्याचा दावा केला आहे. मात्र, स्थानिक आघाड्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यात आल्याचेही पाटील यांच्याकडून सांगण्यात आले.

शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या ताब्यातून जेऊर ग्रामपंचायत हिसकावून घेण्यासाठी आमदार संजय शिंदे यांनी मोठी ताकद लावली होती. त्यामुळे पाटील आणि शिंदे यांच्यासाठी जेऊर ग्रामपंचायतीची निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. त्यात पाटील यांनी पुन्हा बाजी मारली आहे. विशेष म्हणजे माजी आमदार नारायण पाटील यांनीही आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात जेऊरच्या सरपंचपदापासून केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील यांनीही आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आहे.

Karmala Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Election Results : हर्षवर्धन पाटलांनी गड राखला; राष्ट्रवादीचे डाव उलथवत बावड्याची सत्ता राखली

माजी आमदार नारायण पाटील गटाने जेऊर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आमदार शिंदे गटाच्या पॅनेलचा मोठ्या फरकाने दारुण पराभव करून एकहाती सत्ता मिळविली आहे. पाटील गटाने सरपंचपदासह पुन्हा एकदा सर्वच्या सर्व १५ जागा जिंकत सत्ता कायम राखली आहे.

जेऊर ग्रामपंचायतची निवडणूक ही पाटील-शिंदे गटात दुरंगी लढत झाली होती. ग्रामपंचायतीच्या १५ जागांसाठी १५ च उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. परंतु माजी आमदार नारायण पाटील यांनी विरोधकांचे सर्व डावपेच उधळून लावत जेऊर ग्रामपंचायत कायम राखली आहे. जेऊरचे सरपंचपद ओबीसीसाठी राखीव होते. पाटील गटाकडून पृथ्वीराज पाटील, शिंदे गटाकडून नितीन खटके, तर अपक्ष बाळासाहेब कर्चे अशी तिरंगी लढत सरपंचपदासाठी झाली. त्यात पृथ्वीराज पाटील यांनी २३७२ मते घेऊन शिंदे गटाच्या नितीन खटके यांचा १३२९ मतांनी पराभव केला. खटके यांना मते १०४३ मिळाली आहेत, तर अपक्ष उमेदवार बाळासाहेब कर्चे यांना तीन आकडी मते ही पडले नाहीत, त्यांना ९९ मते मिळाली, तर नोटाला ३७ एवढी मते मिळाली.

Karmala Gram Panchayat Election Results
Gram Panchayat Results : शहाजीबापूंनी गावची सत्ता राखली; पण तीन ग्रामपंचायतींवर शेकापचा झेंडा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com