Badlapur School Crime Case : बदलापूरच्या उद्रेकानंतर मंत्री भुसे झाले जागे, बैठकांचा धडाका

Dada Bhuse Politics : बदलापूर येथील शाळेतील घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज प्रशासनाची आढावा बैठक झाली.
Dada Bhuse
Dada BhuseSarkarnama
Published on
Updated on

Badlapur Incident Impact : बदलापूर येथील दुर्दैवी घटनेत प्रशासनाने टोकाची बेफिकेरी दाखवली. त्याचे तीव्र पडसाद समाजात उमटले आहेत. त्यानंतर सरकार खडबडून जागे झाल्याचे चित्र आहे.प्रशासनाचा व्यवहार म्हणजे, 'बैल गेला आणि झोपा केला असाच असतो. त्याचा अनुभव जवळपास प्रत्येकाला आलेला आहे.

राज्यात आणि देशात अनेक मोठ्या दुर्दैवी घटना घडतात. या घटनेनंतर देखील प्रशासन तत्पुरती कार्यवाही करताना दिसते. अशी घटना घडल्यावर तत्पुरती धावपळ होते. नंतर दुसऱ्या दिवसापासून मात्र सर्व काही 'येरे माझ्या मागल्या' या उक्तीप्रमाणे 'जैसे-थे'च असते. त्याचा अनुभव बदलापूर येथील दुर्दैवी आणि अतिशय धक्कादायक घटनेनंतरही येत आहे.

Dada Bhuse
Vasant Gite Politics: शिवसेना ठाकरे गटाची विधानसभेची आक्रमक तयारी की स्वबळाचे संकेत?

बदलापूर येथील घटनेनंतर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) देखील खडबडून जागे झाल्याचे चित्र आहे. भुसे यांनी घाई गडबडीत दुपारी साडेतीनला जिल्ह्यातील शाळांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक बोलावली. या बैठकीला जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, पोलिस आयुक्त, शिक्षण अधिकारी आणि आदिवासी विकास विभागाचे आयुक्त यांचा संबंधित विभागाच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Dada Bhuse
Badlapur School Case : बदलापूर घटनेवरुन थोरातांचा पारा चढला; 'सरकारचे फक्त मोठे कार्यक्रम सुरू; कार्यपद्धतीही खोक्यांवर...'

नाशिक (Nashik) जिल्हाधिकारी कार्यालय आज होणाऱ्या बैठकीत प्रामुख्याने बदलापूर येथे घडलेल्या घटने संदर्भात चर्चा केली जाणार आहे. बदलापूर येथे जे घडले, ते आपल्याकडे घडू नये, यासाठी प्रशासकीय स्तरावर आणि संबंधित संस्थाचालकांना काय सूचना द्यायच्या त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.

आजवर देशात आणि राज्यात गंभीर घटना घडल्यानंतर तसे प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाला शासनाकडून परिपत्रक येत असते. त्यावर तत्पुरती चर्चा होते. प्रशासन आणि अधिकारी अलर्ट झाल्यासारखे चित्र निर्माण केले जाते. प्रत्यक्षात दुसऱ्या दिवसापासून नेहमीचीच बेफिकिरी दिसते.

नाशिक शहरात बांगलादेशातील अत्याचाराच्या निषेधार्थ बंद करण्यात आला होता. त्यातून दोन समाज घटकांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला. त्याचे शेकडो व्हिडिओ क्लिप्स प्रसारित झाले आहेत. मात्र यामध्ये पोलिसांची भूमिका अद्यापही बोटचेपी असल्याचे दिसते.

या दंगलीत शेकडो अतीउत्साही लोकांचा जमाव कार्यरत होता. मात्र सुरवातीला वीस लोकांवर कारवाई झाली. आता त्यावर देखील पुन्हा राजकारण सुरू झाले आहे. निरपराध लोकांवर कारवाई होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. विरोधी पक्षांनी मात्र दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

शहरात झालेली ही दंगल केवळ समाज घटकांनी दाखविलेल्या सामंजस्याने टळली. पोलिसांनी याबाबत घटना घडण्याच्या वेळी केलेली कारवाई उपयुक्त ठरली. मात्र विनापरवाना जमलेल्या जमाव वादग्रस्त ठिकाणी कसा पोहोचला? त्यामागे कोण होते? अफवा कोण पसरवत होते? या सर्व गोष्टींवर आता पोलिसांनी तोंडावर बोट ठेवले आहे. बदलापूरच्या घटनेतून बोध घेऊन कायदा हातात घेण्याचे प्रकार घडणारच नाहीत. या दृष्टीने कारवाईची आवश्यकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com