Jalgaon DCC Bank Election : भाजप उमेदवाराची माघार, राष्ट्रवादीच्या आमदाराची पत्नी बिनविरोध ; जळगाव जिल्हा बँकेत राजकीय समीकरणे फिरली

BJP Withdraws, Jayashree Patil Elected Unopposed : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.
 Jayashree Patil Elected Unopposed
Jalgaon DCC Bank Election : Jayashree Patil Elected Unopposed Sarkarnama
Published on: 
Updated on: 

BJP Withdraws, Jayashree Patil Elected Unopposed : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या प्रक्रियेत मोठी घडामोड घडली. भाजपच्या उमेदवाराने माघार घेतल्याने राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील बिनविरोध निवडून आल्या आहेत.

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. या निवडणुकीत भाजप १०, शिवसेना ७ आणि राष्ट्रवादी (अजित पवार गटाला) ४ जागा मिळतील असा दावा केला जात आहे. दरम्यान जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर कोणत्या मतदारसंघातून कोण माघार घेणार आणि कोण कोणाला संधी मिळणार याकडे लक्ष लागले आहे.

अशातच,उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी उद्याचा मंगळवार (दि.१७) शेवटचा दिवस उरला असता आज सोमवार (दि.१६) अमळनेर तालुक्यातील मनव विकास सोसायटी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार प्रफुल्ल पवार यांनी माघार घेतली. परिणामी, आमदार अनिल पाटील यांच्या पत्नी जयश्री पाटील यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

 Jayashree Patil Elected Unopposed
Nashik Triple Talaq Case : नाशिकमध्ये कायद्यालाच आव्हान, न्यायालयाच्या आवारातच पतीकडून पत्नीला तिहेरी तलाक

भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने अमळनेर तालुक्यातील मनव विकास सोसायटी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या जयश्री अनिल पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. चक्क भाजप उमेदवाराने माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

जिल्हा बॅंकेत महायुती होणार असल्याचे महायुतीच्या बैठकीत ठरले आहे. मात्र, अद्याप काही जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. मात्र, महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न सुरु असल्याने विविध मतदारसंघामध्ये उमेदवारी आणि माघारीचे निर्णय घेतले जात आहेत. प्रफुल्ल पवार यांची माघार देखील याच राजकीय समीकरणाचा भाग असल्याचे बोलले जात आहे.

 Jayashree Patil Elected Unopposed
Heena Gavit : खासदार गोवाल पाडवींची वकिलीची डिग्री तपासा.. ; 'त्या' एका शब्दावरुन नंदुरबारचे आजी-माजी खासदार भिडले

जिल्हा बँकेत आतापर्यंत शिवसेना (शिंदे गट) दोन , भाजप एक आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) एक अशा चार जागा बिनविरोध झाल्या आहेत. उद्या माघारीचा अंतिम दिवस असून आणखी कोणाची माघार होते याकडे लक्ष लागले आहे.

दरम्यान,भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. जामनेर तालुका विकास सोसायटीमधून महाजन यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रघुनाथ पाटील यांचा उमेदवारी अर्ज तांत्रिक कारणास्तव फेटाळण्यात आल्याने मंत्री गिरीश महाजन यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.