Gulabrao Patil News : पवारांना आम्ही घाबरतो, त्यांच्यासारखी बुद्धी कुणाची चालत नाही; पाटलांची मिश्किल टिपण्णी!

Sharad Pawar : तुम्ही सकाळी शपथ घेता, आणखी काय करून टाकता..
Sharad Pawar : Gulabrao Patil
Sharad Pawar : Gulabrao Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

जळगाव जिल्ह्यातील चोपडा या तालुक्यात एका लग्न सोहळ्यात यांनी राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील शाब्दिक टोलेबाजी केली. या लग्नातील वधूचं आडनाव पवार असल्याने, यावर गुलाबराव पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्यावर मजेशीर भाष्य केले आहे. पवारांना आम्ही सुद्धा घाबरून असतो, कारण पवारांची जी बुद्धी चालते, तशी कोणाचीच चालत नाही, असे पाटील म्हणाले.

Sharad Pawar : Gulabrao Patil
Ahmednagar News | धक्कदायक : शाळेनेच फोडला पेपर, परिक्षेच्या एक तास आधीच 119 विद्यार्थ्यांच्या हाती गणिताची प्रश्नपत्रिका!

या लग्न समारंभात बोलताना पाटील म्हणाले, "लग्नातील मुलगी पवार कुटुंबातून येते, त्यामुळे आम्ही घाबरून असतो पवारांना. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही सकाळी सकाळी शपथ घेऊन टाकता आणि काय करून टाकता, आम्हाला माहिती नाही. त्यामुळे पवारांना आम्ही घाबरून असतो. त्यामुळे पवारांना कायम बरोबर घ्यावं लागतं. कारण पवारांची जी बुद्धी चालते, तशी बुद्धी कोणाचीच चालत नाही."

Sharad Pawar : Gulabrao Patil
Sanjay Raut News : राज्यात 'मुका घ्या मुका' कार्यक्रम सुरू ; राऊतांची खोचक टिपण्णी!

पवार कुटुंबावर भाष्य केल्याने आता गुलाबराव पाटलांच्या या छोटेखानी भाषणाची चर्चा आहे. गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्यानंतर आता त्यांचा या व्हिडीओ पाहिला जात आहे. यामुळे पाटील चर्चेत आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.