Nashik Politics: काँग्रेसवर गंभीर आरोप; शिंदेंच्या शिवसेनेला दीड महिन्यांतच 'जय महाराष्ट्र'; हेमलता पाटील यांचा पुन्हा नवा डाव

Ajit Pawar NCP New Entry : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नाशिक शहरातून एकही मतदारसंघात संधी मिळाली नव्हती. महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक नगरसेवक पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहे.
Hemlata Patil .jpg
Hemlata Patil .jpgSarkarnama
Published on
Updated on

Nashik News : नाशिकमध्ये पुन्हा मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे.विधानसभेला इच्छुक असूनही तिकीट डावलल्यानंतर महिला नेत्या हेमलता पाटील यांनी काँग्रेसवर गंभीर आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्या होत्या. पण पाटील यांनी अवघ्या दीड महिन्यांतच शिवसेनेला जय महाराष्ट्र करत नाशिकचं राजकारण तापवलं होतं. आता याच हेमलता पाटील (Hemlata Patil) यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

हेमलता पाटील यांनी शिवसेनेत आपण कामाला न्याय देऊ शकत नसल्यानं राजीनामा देत असल्याचं स्पष्ट केलं होतं.तसेच त्यावेळी आपण सध्यातरी कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचंही स्पष्ट केलं होतं.पण आता पाटील यांनी आपली भूमिका बदलली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

काँग्रेसमधून(Congress) प्रदेश प्रवक्ते पदाचा राजीनामा देत शिवसेनेत दाखल झालेल्या नाशिकच्या हेमलता पाटील यांनी तडकाफडकी शिवसेनेचा राजीनामा दिला. यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे सुसाट इनकमिंग सुरू असलेल्या एकनाथ शिंदेंसाठी पाटील यांचा राजीनामा मोठा धक्का मानला होता.

हेमलता पाटील यांचा उद्या मंगळवारी (ता.19 ऑगस्ट) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कितपत फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Hemlata Patil .jpg
Pune News : मुख्यमंत्री फडणवीसांमुळे पुणेकरांना रोज मनस्ताप? काँग्रेसचा गंभीर आरोप

शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर हेमलता पाटील यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यातून त्यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. त्या व्हिडिओत म्हणाल्या, मी गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेस पक्षामध्ये काम करत होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी इच्छुक असताना मला उमेदवारी मिळाली नाही. म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला असल्याचीही भूमिका त्यांनी मांडली होती.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड महिन्यांत आपण या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नाही. मी योग्य ते काम करू शकत नाही, अशी माझी स्वतःची प्रामाणिक भावना झाली. त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षात काम करायचा नसल्याचा निर्णय घेतल्याचेही त्यांनी त्यावेळी सांगितलं हेमलता पाटील यांनी म्हटलं होतं.

Hemlata Patil .jpg
Gopichand Padalkar: रोहित पवारांची 'बेन्टेक्स'ची टीका झोंबली; पलटवार करताना पडळकरांची गाडी थेट शरद पवारांवरच घसरली, म्हणाले,'50 वर्षे त्यांनी...'

विधानसभा निवडणुकीत नाशिक मध्य मतदारसंघ काँग्रेस पक्षाला हवा होता. त्यासाठी पाटील यांच्यासह विविध इच्छुक उमेदवार होते. या इच्छुकांनी पक्षावर मोठा दबाव निर्माण केला होता. मात्र, महाविकास आघाडीत ही जागा शिवसेना ठाकरे पक्षाला सोडण्यात आली. त्यातून हेमलता पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला नाशिक शहरातून एकही मतदारसंघात संधी मिळाली नव्हती. महाविकास आघाडीचा कोणीही उमेदवार निवडून आला नव्हता. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील अनेक इच्छुक नगरसेवक पक्षातून बाहेर पडण्याच्या मानसिकतेत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com