भुजबळांना प्रश्न, आमदारांना घरे, मग आम्हाला का नाही?

लासलगाव येथे पालकमंत्र्यांच्या गाडीला घेराव घालताना संजयनगर झोपडपट्टीतील नागरिक.
Chhagan Bhujbal & Public at Lasalgaon
Chhagan Bhujbal & Public at LasalgaonSarkarnama
Published on
Updated on

लासलगाव : आमदारांना (MLA) घरे देतात, मग आम्हाला का नाही असा प्रश्‍न करीत राज्याचे अन्न नागरी, पुरवठा व ग्राहक संरक्षण तथा नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) संजयनगर येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या लासलगाव येथील नागरिकांनी गाडी अडविली.

Chhagan Bhujbal & Public at Lasalgaon
नवाब मलिक यांच्या मालमत्तांबाबत `ईडी`ची नाशिकला झाडाझडती?

अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना घरे बांधून देणार असल्याचे जाहीर केले, यावर विविध स्तरावर विषय समजून न घेताच टीका झाली. त्यानंतर या निर्णयाचा फेरविचार झाला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत खुलासा केला. ही सर्व घरे मोफत नाही तर विकत देण्यात येणार आहेत.

Chhagan Bhujbal & Public at Lasalgaon
जितेंद्र आव्हाड गृहनिर्माण घोटाळ्याच्या चक्रव्युहात स्वतःच अडचणीत येणार?

असे असेल तरी सत्ताधारी मंत्र्यांना या निर्णयाबाबत होणाऱ्या विरोधाला तोंड देण्याची नामुष्की आल्याचे उदाहरण लासलगाव येथे पहावयास मिळाले. पालकमंत्री भुजबळ मतदारसंघाच्या दौऱ्यावर लासलगाव येथे आले असताना संजयनगरच्या झोपडीतील नागरिकांनी त्यांची गाडी अडवत घेराव घातला.

आम्हालाही घरे मिळवू द्या असा प्रश्‍न केला. मंत्री भुजबळांनी त्याची दखल घेतली. बेघरांना घरे देण्याची योजना आहेच. मतदारसंघात, जिल्ह्यात तसेच राज्यात अशी हजारो घरे देण्यात आली आहे. दरवर्षी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या विषयाला मंजुरी व निधी दिला जातो. त्यातून घरे बांधली जातात. त्यामुळे तुम्हालाही निश्चितच घरे देऊन न्याय देऊ असे आश्‍वासन त्यांनी दिले. त्यानंतर नागरिकांचे समाधान झाले. पालकमंत्र्यांनी नागरिकांशी चर्चा करीत त्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com