Jalgaon Atlanta Scam : CM फडणवीसांचा एक आदेश अन् सूत्र हलली ; जळगाव महापालिकेला 42 कोटींचा गंडा घालणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल

Jalgaon Atlanta Construction Case : मुख्यमंत्र्यांनी मुंबईत झालेल्या बैठकी दरम्यान जळगाव महापालिकेचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांना दूरध्वनीवरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे स्पष्ट आदेश दिले.
Jalgaon Atlanta Construction Case, JALGAON Devendra Fadnavis
Jalgaon Atlanta Construction CaseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon Municipal News : जळगाव महापालिकेशी संबंधित अटलांटा कन्स्ट्रक्शन प्रकरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निर्णायक वळण मिळाले आहे. मुंबईतील वर्षा बंगल्यात बुधवारी (दि. २९) सायंकाळी झालेल्या बैठकीत अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यानंतर १ मे रोजी रात्री उशीरा या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली,

महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार महापालिकेचे प्रभारी शहर अभियंता योगेश प्रकाश बोरोले यांनी १ मे रोजी रात्री उशीरा याप्रकरणात तक्रार दाखल केली. त्यानुसार जळगाव महापालिकेची तब्बल ४२ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित मे. अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनी (इंडिया) लि. आणि संचालक राझू अंबालाल बाबरोट यांच्यासह इतर संबंधितांविरुद्ध जळगाव शहर पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ४०६ (विश्वासघात), कलम ४०९ (शासकीय नोकराद्वारे किंवा व्यापाऱ्याद्वारे विश्वासघात) आणि कलम ४२० (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

काय आहे प्रकरण?

जळगाव नगरपालिकेने (सध्याची महानगरपालिका) सन १९९६-९७ ते २००१-२००२ या कालावधीत शहरातील रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी अटलांटा कन्स्ट्रक्शन कंपनीला २५६ कामांचे आदेश दिले होते. या कामांसाठी पालिकेने कंपनीला २४ कोटी ३५ लाख रुपये मोबिलायझेशन व मटेरिअल ॲडव्हान्स म्हणून दिले. कंपनीने केलेल्या कामांच्या देयकातून १९ कोटी ५५ लाख रुपये वसूल झाले. मात्र उर्वरित ४ कोटी ७९ लाख रुपये थकबाकी गेल्या दोन दशकांपासून बाकी आहे.

Jalgaon Atlanta Construction Case, JALGAON Devendra Fadnavis
Devendra Fadnavis News: भाजपा-शिवसेना 2029 ला स्वबळावर लढणार? फडणवीसांनी एकाच वाक्यांत विषय संपवताना शिरसाटांनाही टोला लगावला

पालिकेने दिलेल्या नोटिशीला उत्तर देताना (२००५ मध्ये) कंपनीने ही थकबाकी मान्य केली होती, परंतु तरी देखील रक्कम भरली नाही. या थकबाकीवर महाराष्ट्र महापालिका अधिनियम कलम ४४१ नुसार ९ टक्के चक्रवाढ व्याज धरल्यास ३६ कोटी ५४ लाख रुपये, विलंब दंड ३६ लाख रुपये आणि अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी पालिकेने केलेला ९० लाख रुपयांचा खर्च, अशी एकूण ४२.६० कोटींची वसुली कंपनीकडून येणे आहे.

Jalgaon Atlanta Construction Case, JALGAON Devendra Fadnavis
'रिझर्व्ह बँकेची संकल्पना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचीच' Devendra Fadnavis, Bhimjayanti, Mumbai

नगरसेवक देशमुखांनी दिली होती तक्रार

याप्रकरणी भाजप नगरसेवक अरविंद देशमुख यांनी सर्वप्रथम शहर पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. मात्र, तरीही महापालिकेने यावर ठोस भूमिका घेतली नव्हती. मात्र त्यानंतर हा विषय थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे गेला. सीएम फडणवीसांनी आदेश दिल्यानंतर महापालिकेने अटलांटा कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com