सत्कार, सन्मान मला श्रद्धांजली सभेसारखे वाटतात

सार्वजनिक वाचनालयाचा कार्यक्षम खासदार पुरस्कार प्रदान
Nitin Gadkari News Updates
Nitin Gadkari News UpdatesSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : येथील सार्वजनिक वाचनालयातर्फे (Nashik) केंद्रीय परिवहनमंत्री मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा नवी दिल्ली येथे सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी `चांगले काम केले की तेव्हाच ते विसरून जायचे, असे माझ्या आईने सांगितले आहे. त्यामुळे हल्ली तर मला सत्कार, सन्मानाचे कार्यक्रम श्रद्धांजली सभेसारखे वाटतात, अशी मिश्‍कील टिप्पणी केली. (Nitin Gadkari News Updates)

Nitin Gadkari News Updates
गडकरींनी पुरस्कारासह ५ लाखांचा निधी संकटग्रस्त कांदा शेतकऱ्यांसाठी दिला!

नाशिकचे सार्वजनिक वाचनालय नाशिकची परंपरा, इतिहास मोठा आहे. भारतातील सर्वाधिक वाचनालये नाशिकमध्ये असून, सांस्कृतिक नगरी असलेल्या नाशिकची वेगळी वैशिष्ट्ये आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रज, वसंत कानेटकर अशा दिग्गज व्यक्तिमत्त्वांमुळे नाशिक प्रगल्भ असल्याचे श्री गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari News Updates
जिल्हा परिषदेची निवडणुक भाजप स्वबळावर लढणार!

सार्वजनिक वाचनालयातर्फे माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रथमच देण्यात येणारा कार्यक्षम संसदसदस्य पुरस्कार श्री. गडकरी यांना दिल्लीत प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

श्री. गडकरी म्हणाले, की सुरत ते चेन्नई ग्रीनफील्डचे डीपीआर अंतिम टप्प्यात असून, दिल्ली ते चेन्नई अंतर एक हजार ६०० किलोमीटर आहे. ते या ग्रीनफील्ड हायवेमुळे एक हजार २७० किलोमीटर होणार आहे. ५४ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राचा ग्रोथ सेंटर होणार असून, नाशिकला येत्या तीन महिन्यांत भूमिपूजन होईल. रस्त्याच्या बाजूला लॉजिस्टिक पार्क, संशोधन केंद्र, गोडाउन, कोल्डस्टोअरेज असे प्रकल्प यायला हवेत. १२२ किलोमीटर नाशिक जिल्ह्यातून जात आहे. नाशिक-सुरत दोन तासांत पोचता येईल. पेठ सुरगाण्यासारखा आदिवासी भाग विकसित होईल. प्रवासाचा कालावधी कमी होणार असून, प्रदूषण कमी होणार आहे.

शेतकऱ्यांचा सत्कार करा

नाशिकची द्राक्षे चांगली आहेत. येणाऱ्या काळात जागतिक दर्जापर्यंत पोचायचे असेल, तर सुधारणा केली पाहिजे. द्राक्ष महासंघाने प्रगती केली आहे. नाशिक जिल्ह्यात बायो इथेनॉल तयार होत आहे. नाशिकमध्ये उद्योगशीलता, कौशल्य, धाडस करणारे तरुण असून, त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. नाशिकमधील खासदारांनी अभ्यास करून कांदा, द्राक्ष निर्यात करणाऱ्या २५ शेतकऱ्यांचा नागरी सत्कार केला पाहिजे, असे श्री. गडकरी यांनी नमूद केले.

या वेळी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार डॉ. सुभाष भामरे, हेमंत गोडसे, विनय सहस्रबुद्धे, रक्षा खडसे, संजय करंजकर, जयप्रकाश जातेगावकर, डॉ. शंकर बोऱ्हाडे, धर्माजी बोडके, देवदत्त जोशी, गिरीश नातू, ॲड. अभिजित बगदे आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com