कंगणाच्या मताशी असहमत भाजपने पद्मश्री कसा दिला?, पागल पुरस्कार का नाही दिला!

राष्ट्रवादी महिला काँग्रेसने कंगणा रानावत हिच्या विरोधात पोलिसांत निवेदन दिले आहे.
Kangna Ranaut
Kangna RanautSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : भाजपचे नेते रावसाहेब दानवे म्हणतात, आम्ही कंगणा रानावतच्या म्हणन्याशी सहमत नाही. मग भाजपच्या सरकारने त्यांना संरक्षण व पद्मश्री पुरस्कार का दिला?. पागल महिला असा पुरस्कार का नाही दिला?. कंगणा खऱ्या अर्थाने केवळ त्यासाठीच पात्र आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा अनिता भामरे यांनी म्हटले आहे.

Kangna Ranaut
`महाराष्ट्रात आता कोणत्याही क्षणी आणीबाणी लागू होईल`

कंगणा रानावत हिच्या विधानामुळे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, नेते चांगलेच संतप्त झाले आहेत. यासंदर्भात युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तालयात निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महिला आघाडीने देशद्रोहाचा गुन्हा दाखल कारा तसेच पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी केली.

एका वाहिनीच्या कार्यक्रमात कंगणा हिने १९४७ मध्ये भारताला मिळालेलं स्वातंत्र्य ही भीक होती, तर खरे स्वातंत्र्य हे २०१४ साली मिळाले असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे सर्व थरातून तीच्यावर टिका होत आहे. यासंद्रभात कंगणा राणावत ही पद्मश्री नाही तर पागल स्त्री आहे. तीला वेड्यांच्या रूग्णालयात दाखल करा असे राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहराध्यक्षा अनिता भामरे यांनी म्हटले आहे.

Kangna Ranaut
भाजपने फुंकले नाशिक महापालिका निवडणुकीचे रणशिंग

त्या म्हणाल्या, १८५७ पासून ते १९४७ पर्यंतच्या कालखंडात लाखो स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन ब्रिटीशांविरोधात लढा दिला. त्यातून १९४७ साली भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा इतिहास माहित असतांना देखील केवळ भाजपचे लांगूलचालन करण्याकरिता कंगणा राणावत सारखी स्त्री बिनडोक असल्याचे दाखवते, खरे तर ती एक एजेंडा चालवून देशाच्या अभिमान, इतिहासाला वेगळी वाट दाखवून नव्या पिढीला गोंधळात टाकण्याचे षडयंत्र करीत आहे. त्यातून भाजप व त्यांच्या नेत्यांच्या मनात गुदगुल्या व्हाव्यात म्हणून तीने हे केले असावे. यावरून तिची विघातक वृत्ती व बौद्धिक पात्रता लक्षात येते. एकतर ती भाजपला जाणूनबुजून खुष करण्यासाठी असे वक्तव्य करते किंवा ती बिनडोक आहे असे तरी तिच्या वागणुकीतून दिसते. तेव्हा तिला वेड्यांच्या रूग्णालयात भाजपच्याच लोकप्रतिनिधींनी दाखल करावे.

कंगणा राणावतच्या या वक्तव्याची गंभीर दखल घेत देशभरातून तिला मिळालेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा व तिच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी सरकार कडे मागणी होत आहे. यापूर्वी कंगणाने शेतकऱ्यांना आतंकवादी म्हटले तर मुंबईतील आपल्या बेकायदा बांधकामावर महापालिकेने हातोडा चालवला तेव्हा मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणून संबोधले. भाजपचे तिच्याविषयी असलेले अतूट प्रेम पाहता केंद्र सरकार पद्मश्री पुरस्कार परत घेईल किंवा तिच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करेल अशी सुतराम शक्यता दिसत नाही. तेव्हा किमान अशा पद्मश्री नाही तर पागल स्त्रीला वेड्यांच्या रूग्णालयात तरी दाखल करावे, जेणेकरून तिच्याकडून भविष्यात पुन्हा असा बुद्धीभेद करण्याचे धाडस ती करणार नाही.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com